
Positivity is the Key to Success and Overcoming Life's Challenges
Sakal
डॉ. सचिन जैन - संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
आपली आंतरिक ऊर्जा कामांच्या पूर्ततेसाठी खूप आवश्यक आहे. कामासाठी लागणाऱ्या ऊर्जेचा मुख्य स्रोत आपण स्वतःच असतो. आपली ऊर्जा चांगल्या कामामध्ये गुंतवू तेवढी अजून ती आपल्या मनात, शरीरात उत्पन्न होते. उष्मप्रवाहशास्त्राचा दुसरा नियम सांगतो की, एका वेगळ्या प्रणालीची एकूण एंट्रॉपी केवळ कालांतराने वाढू शकते आणि कधीही कमी होत नाही. विश्वाची एंट्रॉपी नेहमीच वाढत असते. म्हणूनच सकारात्मक ऊर्जा अथवा विचारसरणी ठेवतो तेवढी ती आपल्याला पुन्हा मिळते. त्यासाठी आपल्या सभोवतालच्या वातावरणाचा आणि मित्र-परिवार कसा आहे हे महत्त्वाचे. आपण सकारात्मक विचारांच्या लोकांच्या सानिध्यात रहाल तेवढी आपली ऊर्जा आणि उत्साह वाढतो. अशा ऊर्जेचा स्रोत आपल्याला आयुष्यात पुढे जायला मदत करतो.