- डॉ. राजेश ओहोळ, करिअर मार्गदर्शक
वायू आणि द्रवांच्या प्रवाहांचा अभ्यास केला जातो ते शास्त्र म्हणजे फ्लुइड डायनामिक्स. भौतिकशास्त्रातील एक उपशाखा. कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनामिक्स (सीएफडी) ही कॉम्प्युटर एडेड इंजिनिअरिंगच्या व्यापक शीर्षकाखाली येणारी एक शाखा आहे.
काही दशकांमध्ये, ‘सीएफडी’ नवीन उत्पादने आणि प्रक्रियांच्या डिझाइन आणि ऑप्टिमायझेशनसाठी शक्तिशाली साधन म्हणून उदयास आले आहे. उपलब्ध संगणकीय शक्तीमध्ये सतत वाढ होत असताना, ‘सीएफडी’ सिम्युलेशनची अचूकता सुधारली असून हे तंत्र संशोधन आणि विकासाचा अविभाज्य भाग आहे.