esakal | Indian Oil मध्ये 500 हून अधिक पदांसाठी भरती; 1 लाखापर्यंत मिळणार पगार I IOCL Recruitment
sakal

बोलून बातमी शोधा

IOCL Recruitment
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने विविध राज्यांमध्ये 500 पेक्षा जास्त रिक्त पदांसाठी अर्ज मागविले आहेत.

Indian Oil मध्ये 500 हून अधिक पदांसाठी भरती; 1 लाखापर्यंत मिळणार पगार

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

IOCL Recruitment 2021 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOCL) विविध राज्यांमध्ये 500 पेक्षा जास्त रिक्त पदांसाठी अर्ज मागविले आहेत. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत लवकरच संपत आहे. ऑयल कंपनीने आसाम, बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि ओडिशामधील IOCL च्या रिफायनरीज आणि पेट्रोकेमिकल युनिट्ससाठी कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक आणि कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक या पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत.

दरम्यान, भरतीची अधिसूचना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटवर www.iocl.com जारी करण्यात आलीय. निवडलेल्या उमेदवारांना 25,000 रुपये आणि 1,05,000 रुपयांपर्यंत वेतनश्रेणी दिली जाईल.

इंडियन ऑइल (IOCL) भरती पोस्ट आणि रिक्त पदांची संख्या

  • कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक - IV (प्रोडक्शन) - 296 जागा

  • कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक - IV (P&U) - 35 जागा

  • कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक- IV (इलेक्ट्रिकल)/कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक- IV (P & U-O & M)- 65 जागा

  • कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक - IV (यांत्रिक) / कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक - IV - 32 जागा

  • कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक- IV (इन्स्ट्रुमेंटेशन)/कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक- IV- 37 जागा

  • कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक - IV (अग्नि आणि सुरक्षा) - 14 जागा

  • कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक - IV - 29 जागा

  • कनिष्ठ सहाय्यक - IV / कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक - IV - 4 जागा

  • कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक - IV - 1 जागा

भरतीसाठी वयोमर्यादा : सामान्य उमेदवारांसाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 30 सप्टेंबर 2021 रोजी 26 वर्षे असावे. सरकारी नियमांनुसार, यात सूट दिली जाईल.

अर्ज कसा करावा?

1. प्रथम IOCL च्या अधिकृत वेबसाइटला www.iocl.com भेट द्या

2. आता 'What’s New' पर्यायावर क्लिक करा.

3. त्यानंतर 'Requirement of Experienced Non-Executive Personnel 2021 in IOCL, Refineries Division' या पर्यायावर जा.

4. 'Detailed advertisement' वर क्लिक करा.

5. शेवटी 'Click here to Apply Online' वर क्लिक करुन माहिती मिळवा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक उमेदवार 12 ऑक्टोबर 2021 (सायंकाळी 5) पर्यंत अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज यशस्वीरित्या सादर केल्यानंतर उमेदवारांनी कागदपत्रे 23 ऑक्टोबरपर्यंत पोस्टाने पाठवणे आवश्यक आहे.

loading image
go to top