esakal | इस्रोत नोकरीची मोठी संधी; मुलाखतीसह मिळणार 'इतका' पगार I ISRO Recruitment
sakal

बोलून बातमी शोधा

ISRO Recruitment
इस्रोत नोकरीची मोठी संधी

इस्रोत नोकरीची मोठी संधी; मुलाखतीसह मिळणार 'इतका' पगार

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

ISRO Recruitment 2021, Sarkari Naukri 2021 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था, ISRO ने ज्युनिअर संशोधन फेलोच्या (JRF) 16 रिक्त पदांसाठी नुकतीच अधिसूचना जारी केलीय. उमेदवारांना सुरु असलेल्या ऑक्टोबर महिन्यात वॉक-इन मुलाखतीसाठी उपस्थित राहावं लागणार आहे. अर्जासाठी आवश्यक पात्रता, वेतन इत्यादी तपशील iirs.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आलाय.

ISRO भरतीच्या मुलाखती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग, IIRS येथे आयोजित केल्या जाणार आहेत, तर प्रत्येक रिक्त जागेवर एक विशिष्ट पोस्ट कोड दिला जाईल. मुलाखतीच्या तारखा पोस्ट कोडनुसार निश्चित केल्या जाणार असून भरती होणाऱ्या प्रत्येक रिसर्च फेलोला दरमहा 31,000 रुपये वेतन मिळणार आहे. दरम्यान, भरतीसाठी आवश्यक पात्रता प्रत्येक रिक्त पदासाठी भिन्न असेल.

हेही वाचा: खुशखबर! इंडियन आर्मीत NCC भरती; तब्बल 2.50 लाख मिळणार पगार

मुलाखतीचे वेळापत्रक

  • JRF 66, JRF 68, JRF 70, JRF 71 - 22 ऑक्टोबर, 2021 (सकाळी 8:30)

  • JRF 67- 25 आणि 26 ऑक्टोबर, 2021 (सकाळी 8:30)

  • JRF 69 आणि JRF 74 - 27 ऑक्टोबर 2021 (सकाळी 8:30)

  • JRF 72 आणि JRF 73 - 28 ऑक्टोबर, 2021 (सकाळी 8:30)

  • JRF 75 आणि JRF 76 - 29 ऑक्टोबर 2021 सकाळी 8:30 वाजता

वॉक-इन मुलाखतीचा पत्ता - IIRS सिक्युरिटी रिसेप्शन, IIRSISRO/ DOS, 4 कालिदास रोड, डेहराडून - 248001 हा असणार आहे. उमेदवारांनी सोबत आपली कागदपत्रे घेऊन जावीत.

loading image
go to top