

ISRO YUVIKA 2026 registration process
Sakal
ISRO Young Scientist Programme details: अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर घडवण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. Indian Space Research Organisation (ISRO) यांनी युविका २०२६ (YUva VIgyani KAryakram – Young Scientist Programme) या उपक्रमाची अधिकृत घोषणा केली आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांना लहान वयातच अवकाश विज्ञानाची ओळख करून देणे आणि STEM (Science, Technology, Engineering, Mathematics) क्षेत्राकडे आकर्षित करणे हा आहे.
युविका २०२६ अंतर्गत विद्यार्थ्यांना अवकाश तंत्रज्ञान, उपग्रह प्रणाली, प्रक्षेपण तंत्र आणि त्यांचे दैनंदिन जीवनातील उपयोग यांची मूलभूत माहिती दिली जाणार आहे. भविष्यात शास्त्रज्ञ, अभियंते आणि संशोधक घडवण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.