ITI Admission : लघुलेखन अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ११ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत

शासकीय आयटीआयमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता ‘स्टेनोग्राफी मराठी’ या अभ्यासक्रमाला ऑगस्ट २०२३ पासून प्रवेशाची मान्यता मिळाली
iti Application deadline for admission to stenography marathi course is 11th October education marathi news
iti Application deadline for admission to stenography marathi course is 11th October education marathi news

पुणे : औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) संस्थेत महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळामार्फत स्टेनोग्राफी मराठी (लघुलेखन मराठी) या अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश घेण्यासाठी बुधवारपर्यंत (ता.११) मुदत दिली आहे.

शासकीय आयटीआयमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता ‘स्टेनोग्राफी मराठी’ या अभ्यासक्रमाला ऑगस्ट २०२३ पासून प्रवेशाची मान्यता मिळाली आहे. त्यानुसार व्यवसायाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अभ्यासक्रमासाठी ‘https://msbsvet.edu.in’  संकेतस्थळावर ‘युजर मॅन्युअल फॉर कँडिडेट’मध्ये ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज आणि दिलेले शुल्क भरून विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित करावा आणि त्यानंतर संस्था आणि व्यवसायाचा विकल्प भरण्यात यावा.

अभ्यासक्रमासाठी व्यवसायाची मुदत एक वर्ष असून प्रवेश क्षमता ३० इतकी आहे. तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. अभ्यासक्रमात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना एमएसबीएसव्हीईटी मंडळाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अभ्यासक्रमामध्ये १०० शब्द प्रति मिनीट लघुलेखन (शॉर्ट हॅण्ड) आणि ३० शब्द प्रति मिनीट मराठी टंकलेखन हे विषय समाविष्ट आहेत, अशी माहिती संस्थेचे उपसंचालक आर. बी. भावसार यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com