
CBSE Result: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी २०२५ चा बारावीचा निकाल जाहीर केला. यंदा बारावीच्या निकालात ०.४१ टक्क्यांची साधारण वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. यावर्षी बारावीच्या निकालात मुलींनी पुन्हा एकदा मुलांच्या तुलनेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ९१.६४% मुली उत्तीर्ण झाल्या, तर ८५.७०% मुले उत्तीर्ण झाली. मुलींनी मुलांच्या तुलनेत ५.९४% जास्त उत्तीर्ण होण्याचा विक्रम केला आहे.