
पुणे: देशभरातील तब्बल १२ लाख ५८ हजार १३६ विद्यार्थ्यांनी जानेवारीत पहिल्या सत्रात झालेली ‘जेईई मेन २०२५’ ही परीक्षा दिली. या परीक्षेत तब्बल १४ विद्यार्थ्यांना जेईई मेन परीक्षेतील पेपर एकमध्ये १०० एनटीए स्कोअर मिळविण्यात यश आले आहे. यात महाराष्ट्रातील विशाद जैन या विद्यार्थ्याला १०० एनटीए स्कोअर मिळाला आहे.