
जेईई-मेन परीक्षा : रजिस्ट्रेशन प्रोसेस १ मार्चपासून सुरू होणार
नवी दिल्ली : जेईई-मेनचा पहिला टप्पा एप्रिलमध्ये घेतला जाईल तर दुसरा टप्पा मेमध्ये नियोजित केला जाईल, असे नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचा पहिला टप्पा १६ ते २१ एप्रिल आणि दुसरा टप्पा २४ ते २९ मे या कालावधीत घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस १ मार्चपासून सुरू होणार आहे. अर्ज कसा करावा याविषयी माहिती...
जेईई परीक्षेच्या तारखेसह अशीही माहिती देण्यात आली आहे की, रजिस्ट्रेशन प्रोसेस १ मार्चपासून सुरू होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना जेईई मेन्स २०२२ परीक्षेच्या एका किंवा दोन्ही सत्रासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा. एनटीएने दिलेल्या नोटिसीनुसार जेईई मेन्स दोन फक्त दोन वेळा आयोजित केली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना जेईई मेन परीक्षा २०२२ द्यायची आहे त्यांनी वेळेत जेईई परीक्षेचा अर्ज भरावा.
संयुक्त प्रवेश परीक्षेचे (जेईई) मुख्य दोन पेपर असतात. याअंतर्गत पदवीपूर्व अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी पहिला पेपर एनआयटी, आयआयआयटी आणि इतर केंद्र अनुदानित तांत्रिक संस्था आणि राज्य सरकारांनी आयोजित केला जातो. JEE (प्रगत)साठी देखील ही पात्रता परीक्षा आहे. जी आयआयटी प्रवेशासाठी घेतली जाते. बी.आर्क आणि बी.प्लॅनिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दोन पेपर घेण्यात येतात.