JEE Main Result : जेईई मेनचा निकाल जाहीर; राज्यातील सात विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल

देशभरातील आयआयटीसह देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील बी.ई.,बी.टेक प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई (मेन)२०२४ या सामाईक परीक्षेचा पेपर-१ चा निकाल जाहीर.
JEE mains exam result
JEE mains exam resultesakal

मुंबई - नॅशलन टेस्टींग एजन्सी (एनटीए) मार्फत देशभरातील आयआयटीसह देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील बी.ई.,बी.टेक प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई (मेन)२०२४ या सामाईक परीक्षेचा पेपर-१ चा निकाल जाहीर झाला असून यात राज्यातील तब्बल ७ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल मिळवले आहेत.

यात निलकृष्ण गजरे देशात पहिला तर दक्षेश मिश्रा दुसऱ्या स्थानावर आहे. त्यासोबतच १०० पर्सेंटाईल मिळवणाऱ्यांत प्रकाश आर्यन, मुहंमद सुफियान, विशारद श्रीवास्तव, प्रणव पाटील आणि अर्चित पाटील यांचा समावेश आहे.

एनटीएमार्फत ४ ते ९ एप्रिल या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली होती.

यात ११ लाख ७९ हजार ५६९ जणांनी नोंदणी केली त्यातील १० लाख ६७ हजार ९५९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात ५६ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. यात तेलंगणा राज्यातील सर्वाधिक विद्यार्थी आहेत.

जेईई मेनच्या परीक्षेत प्रवर्गनिहाय १०० पर्सेंटाइल मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये राज्यात सर्वसाधारण प्रवर्गातून दशकेश मिश्रा, आर्यन प्रकाश, मुहंमद सुफियान, विशारद श्रीवास्तव आणि अर्चित पाटील यांचा समावेश आहे. तर ओबीसी(एनसीएल)मधून गजरे निलकृष्णा, प्रणव पाटील यांचा समोवश आहे.

देशात एससीतून तामिळनाडूतील आराधना आर आणि एसटीतून देशात जगन्नाधाम मोहिथ याचा समावेश आहे. या दोघांना ९९.९९ इतके पर्सेंटाईल मिळाले आहेत. मुलींमध्ये देशात कर्नाटकाची सनवी जैन आणि दिल्लीची शायना सिन्हा हिचा समावेश आहे. तृतीयपंथीयमध्ये पश्चिम बंगाल येथील भूमिका सहा ही विद्यार्थिनी असून तिला ५६.६७ पर्सेंटाईल मिळाले आहेत.

दरम्यान, एनटीएकडून जेईई (मुख्य) – 2024 सत्र 1 साठी पेपर 2A (B.Arch.) आणि 2B (B.प्लॅनिंग) साठी एनटीए स्कोअर स्वतंत्रपणे जारी केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

प्रवर्गनिहाय विद्यार्थ्यांची संख्या

प्रवर्ग - विद्यार्थ्यांची संख्या

जनरल - ३७७९२१

जन-ईडब्ल्युएस - १३४४६५

ओबीसी-एनसीएल - ४१६४४०

एससी - १०३४२२

एसटी - ३५७११

तृतीयपंथी - ८

दिव्यांग - ३३६९

एकूण - १०६७९५९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com