esakal | JEE Mains 2021: महाराष्ट्रातील दोघे टॉपर; १३ जणांना पैकीच्या पैकी गुण
sakal

बोलून बातमी शोधा

Students_Result

शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे.

JEE Mains 2021: महाराष्ट्रातील दोघे टॉपर; १३ जणांना पैकीच्या पैकी गुण

sakal_logo
By
वृत्तसंस्था

JEE Mains Result 2021: नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. मार्च सत्रात झालेल्या या परीक्षेत देशभरातील एकूण १३ परीक्षांर्थींनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. ही परीक्षा १६ ते १८ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. ६,१९.३६८ विद्यार्थी-विद्यार्थीनींनी ही परीक्षा दिली होती. 

शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. अथर्व अभिजीत तांबट आणि गार्गी मार्कंट बक्शी यांनी १०० टक्के गुण मिळवत महाराष्ट्राची मान देशभरात उंचावली आहे. या यादीत दिल्लीच्या सिद्धार्थ कालरा, काव्या चोप्रा, तेलंगणाच्या बन्नूरू रोहित कुमार रेड्डी, मदुर आदर्श रेड्डी आणि जोसयुला व्यंकट आदित्य, पश्चिम बंगालच्या ब्रतिन मंडल, बिहारच्या कुमार सत्यदर्शी, राजस्थानच्या मृदुल अग्रवाल, जेनिथ मल्होत्रा आणि तमिळनाडूच्या अश्विन अब्राहम यांचा समावेश आहे. 

Success Story : BSFचा जवान पाचव्या प्रयत्नात बनला IAS

असा पाहा निकाल - 
- सर्वप्रथम जेईईच्या jeemain.nta.nic.in अधिकृत वेबसाईटवर जा. 
- त्यानंतर JEE Main मार्च सत्रच्या निकालासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 
- आता तुमची माहिती जसे की अॅप्लिकेशन नंबर, जन्म तारीख आणि सिक्युरिटी पिन प्रविष्ट करा.
- JEE Main निकालाची विंडो आपल्या स्क्रीनवर उघडेल.
- उमेदवार त्यांचा निकाल तपासल्यानंतर त्यांचे गुणपत्रक डाउनलोड करू शकतील.

दुसऱ्यांदा ही परीक्षा १३ भाषांमध्ये (इंग्रजी, हिंदी, गुजराती, आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू) घेण्यात आली.

टॉपर्स अभ्यासात 'टॉप' का होतात माहिती आहे?; 'ही' आहेत त्यामागची खरी कारणं​

मेन्सनंतर पुढे काय?
जर तुम्ही पहिल्या २,५०,००० उमेदवारांपैकी एक असाल, तर तुम्हाला जेईई अॅडव्हान्स परीक्षेला बसण्याची संधी मिळेल. ही परीक्षा तीन सत्रांमध्ये घेतली जाते. एखाद्या वेळस जर तुम्हाला कमी गुण मिळाले असतील, तर तुम्हाला पुढील वेळेस चांगला स्कोर करण्यास संधी आहेत. तुम्ही दिलेल्या सर्व प्रयत्नांपैकी सर्वोत्तम गुणांद्वारे एनटीए रँकसाठीची यादी तयार केली जाते. एनटीए एप्रिल आणि मे २०२१ मध्ये आणखी दोन सत्रांत ही प्रवेश परीक्षा घेणार आहे.

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image