तुम्हाला लगेच नोकरी हवीय का? सोलापूर विद्यापीठात 114 कोर्सेस

तुम्हाला लगेच नोकरी हवीय का? सोलापूर विद्यापीठात 114 कोर्सेस
सोलापूर विद्यापीठात 114 कोर्सेस
सोलापूर विद्यापीठात 114 कोर्सेसCanva
Summary

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे स्वागत करीत सोलापूर विद्यापीठाने अभ्यासक्रमात बदल केला आहे.

सोलापूर : पदवी तथा पदव्युत्तर शिक्षण (Education) घेऊनही नोकरीसाठी (Jobs) विद्यार्थ्यांना वणवण भटकावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यावर उपाय शोधून पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने (Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University) पारंपरिक शिक्षणाला व्यावसायिकतेची जोड दिली आहे. कौशल्य विकासातून (Skill development) विद्यापीठाने तब्बल 114 कोर्स सुरू केले असून, तीन महिने ते एक वर्षापर्यंतचे हे कोर्स केल्यानंतर संबंधितांना प्रमाणपत्र दिले जात आहे. त्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे.

सोलापूर विद्यापीठात 114 कोर्सेस
ऑनलाइन परीक्षेत अडथळा, सोलापूर विद्यापीठाकडे 285 अर्ज

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे (National Education Policy) स्वागत करीत विद्यापीठाने अभ्यासक्रमात बदल केला आहे. पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेतानाच कौशल्य विकासाचा एक कोर्स निवडणे बंधनकारक आहे; जेणेकरून विद्यार्थ्याला या कोर्समधून लगेचच व्यवसाय अथवा रोजगार मिळेल, असा त्यामागचा हेतू आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी 110 महाविद्यालये संलग्नित असून विद्यापीठात दरवर्षी 80 हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. या नव्या बदलामुळे अनेकांना विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगार मिळत आहे. दहावी, बारावी पास-नापास, पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्यांसाठी कोर्सेस असल्याने त्या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांची गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे. कोरोना काळात योगा, मेडिटेशनसह मेडिकलसंबंधित कोर्सेसचा लाभ झाला आहे. पारंपरिक शिक्षणाला सोबत घेऊन रोजगार निर्मितीचे धडे देत आता विद्यापीठाने शैक्षणिक क्रांती केली आहे. संशोधनावर भर देत आता विद्यापीठाने महापुरातील भूस्सखलन व शहरातील प्रदूषणातील वाढ, यावरही संशोधन हाती घेतले आहे.

सोलापूर विद्यापीठात 114 कोर्सेस
महाविद्यालय स्तरावरच प्रवेश! प्रथम वर्षाची द्वितीय सत्र परीक्षा ऑनलाइनच

कमी कालावधीचा कौशल्य विकासाचा कोर्स करून विद्यार्थ्यांना तत्काळ जॉब मिळेल, असे कोर्स विद्यापीठाने सुरू केले आहेत. मेडिकल, आरोग्य, संगणक, शेअर मार्केट, भाषा, भाषांचे अनुवाद अशा कोर्सेसचा त्यात समावेश आहे. त्यातून निश्‍चितपणे अनेकांना रोजगार मिळाला आहे.

- डॉ. विकास घुटे, प्रभारी कुलसचिव, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

विद्यापीठातील महत्त्वाचे कोर्सेस

ऑपरेशन थिएटर असिस्टंट, हेल्थ असिस्टंट, मेडिकल लॅब असिस्टंट, एक्‍स-रे टेक्‍निशियन, सीटी स्कॅन असिस्टंट, लेसर ऍण्ड कॉस्मेटिक फॉर स्किन टेक्‍निशियन, डायलेसिस टेक्‍निशियन, क्रिटिकल केअर थेरेपी, इंडोस्कोपी असिस्टंट, योगा शिक्षक, डिझेल व मोटार मेकॅनिकल, वायरमन, जिओ इन्फॉर्मेटिक्‍स, हॅंडलूम प्रॉडक्‍ट्‌स डिझायनिंग ऍण्ड मॅन्युफॅक्‍चिरिंग, ई-कॉमर्स, डिप्लोमा इन चैन मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, शेअर मार्केटिंग, स्टॅटिस्टीकल पॅकेज फॉर सोशल सायन्स, एक्‍सेल ऍण्ड ऍडव्हान्स एक्‍सेल, स्पोकन इंग्लिश, ड्रेस डिझायनिंग, मॉन्टेसरी शिक्षक (मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड), जर्नालिझम ऍण्ड मास कम्युनिकेशन, सुगम संगीत, डिजिटल पत्रकारिता, कथ्थक नृत्य, भरतनाट्यम, हिस्टोरिकल जर्नालिझम, प्रूफ रीडिंग ऍण्ड एडिटिंग, रशियन, चिनी भाषा, स्किल डेव्हलपमेंट (मराठी-हिंदी, मराठी-इंग्रजी, मराठी-कन्नड भाषा अनुवादक), कोर्स इन संस्कृत, प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ टीचिंग, टीचर करिअर, डिप्लोमा इन लेबर लॉ ऍण्ड लेबर वेल्फेअर, डिप्लोमा इन ह्यूमन राईट्‌स, डॉक्‍युमेंटरी स्क्रिप्ट, फिल्म मेकिंग ऍण्ड व्हिडिओ एडिटिंग, अँकरिग रेडिओ, टिव्ही ऍण्ड इव्हेंट्‌स, ऍग्रो टूरिझम, सेल्फ डिफेन्स, सोलर ट्रेनिंग करिअर, इंटेरिअर डेकोरेशन ऍण्ड डिझायनिंग अशा प्रकारचे 114 कोर्सेस विद्यापीठाने सुरू केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com