
अनेकांसाठी 2022 हे वर्ष खूपच भयानक गेलं. कारण, आर्थिक मंदीचं कारण देत अनेक कंपन्यांनी काही कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं.
Jobs Layoffs : कर्मचाऱ्यांसाठी 2022 ठरलं संकटाचं; नोकरीत कपात करणाऱ्या 20 प्रमुख कंपन्यांची यादी जाहीर
Job Cuts 2022 : अनेकांसाठी 2022 हे वर्ष खूपच भयानक गेलं. कारण, आर्थिक मंदीचं कारण देत अनेक कंपन्यांनी काही कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं. नोकरीतील कपातीचा भाग म्हणून शेकडो कर्मचार्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं, तर अनेक कर्मचाऱ्यांना अजूनही काम सोडण्यास सांगितलं जात आहे.
नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत Meta, Twitter, Salesforce, Netflix, Cisco, Roku यांसारख्या कंपन्यांच्या नेतृत्वाखालील मोठ्या प्रमाणावर नोकरीत कपात करून US टेक क्षेत्रातील 73,000 हून अधिक कामगारांना काढून टाकण्यात आलं. जागतिक मंदीच्या काळात स्पेक्ट्रममधील अधिकाधिक कंपन्या कर्मचाऱ्यांना काढून टाकत असल्यानं जगभरातील किमान 853 टेक कंपन्यांनी आतापर्यंत 137,492 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं.
हेही वाचा: Gujarat Election : रवींद्र जडेजाची पत्नी उभी असतानाही वडिलांनी दिलं नाही भाजपला मत? मतदानानंतर केलं मोठं भाष्य!
'या' 20 प्रमुख कंपन्यांमध्ये नोकरीत केली कपात
Amazon
Apple
Cisco
Chime
Salesforce
Dapper Labs
Digital Currency Group
DoorDash
Opendoor
Galaxy Digital
HP
Peloton
Intel
Lyft
Meta
Twitter
Stripe
Qualcomm
Upstart
Seagate
जगभरातील मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रालाही नोकरी कपातीचा फटका बसला आहे. कारण, जागतिक आर्थिक मंदीच्या काळात जाहिरातदारांनी खर्च कमी केला आहे. Axios च्या मते, मीडिया इंडस्ट्रीमध्ये या वर्षी ऑक्टोबरपर्यंत 3,000 हून अधिक नोकर्या कमी झाल्या आहेत, तर आणखी काही मार्गावर आहेत. त्यामुळं नोकरी गमावावी लागत असल्यामुळं कर्मचाऱ्यांवर संकट ओढावलं आहे.