करिअर घडविताना : महा-एमबीए सीईटी परीक्षा

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे एमबीए/एमएमएस सीईटी महाराष्ट्रातील एमबीए ३३० महाविद्यालयांत प्रवेशाकरिता राबविली जाते.
Education
EducationSakal
Summary

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे एमबीए/एमएमएस सीईटी महाराष्ट्रातील एमबीए ३३० महाविद्यालयांत प्रवेशाकरिता राबविली जाते.

- के. रवींद्र

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे एमबीए/एमएमएस सीईटी महाराष्ट्रातील एमबीए ३३० महाविद्यालयांत प्रवेशाकरिता राबविली जाते.

पदवीनंतर मॅनेजमेंट किंवा व्यवसाय प्रशासनातील क्षेत्रात करिअर त्यासाठी ‘एमबीए’ हा विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. ‘एमबीए’मध्ये वित्त, विक्री, विपणन, मानव संसाधन, ऑपरेशन्स व्यवस्थापन इ. मुख्य स्पेशलायझेशन आहेत.

‘एमबीए’ करणारे दोन प्रकारचे विद्यार्थी प्रवेश घेतात, एक म्हणजे पदवी शिक्षण झाल्यावर लगेच पदव्युत्तर शिक्षण व दुसरे नोकरी करत असताना ‘एमबीए’ प्रवेशासाठी प्रयत्न करणारे. या दोन्हीकरिता प्रवेश परीक्षा अनिवार्य आहे.

परीक्षेच्या तारखा - २५ व २६-मार्च-२०२३

परीक्षा पॅटर्न -

  • महा-एमबीए/एमएमएस सीईटी परीक्षा ऑनलाइन सीबीटी मोडमध्ये घेतली जाईल.

  • एकूण परीक्षेचा कालावधी १५० मिनिटांचा असेल.

  • एमएएच सीईटी परीक्षेच्या पॅटर्ननुसार, ४ विभागांमधून २०० प्रश्न विचारले जातील

  • महा-सीईटी गुणांकन योजनेनुसार, कोणतेही नकारात्मक चिन्हांकन नाही आणि उमेदवारांना प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण दिले जातील.

  • ५. उमेदवारांनी त्यांच्या आवडीच्या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी किमान आवश्यक गुण मिळवणे आवश्यक आहे.

प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी -

  • CETCELL अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  • MAH MBA/MMS CET वर क्लिक करा

  • ‘एमएएच सीईटी प्रवेशपत्र’ या लिंकवर क्लिक करा.

  • महा-सीईटी नोंदणीच्या वेळी वापरलेले तुमची लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करा.

  • एमएएच सीईटी प्रवेशपत्र २०२३ स्क्रीनवर दिसेल.

  • महा-सीईटी २०२३ प्रवेशपत्र परीक्षेच्या तारखेपर्यंत पोर्टलवर उपलब्ध असेल.

  • प्रवेशपत्राची पीडीएफ स्वरूपात प्रिंटआऊट घ्या आणि परीक्षेच्यादिवशी प्रवेशपत्र व ओळखपत्र सोबत घेऊन जा.

महा-एमबीए सीईटी - महाराष्ट्रातील टॉप महाविद्यालयांचा अपेक्षित कटऑफ

तसेच, एमसीए-सीईटी येत्या २७ मार्च २०२३ रोजी होणार आहे, ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल आणि प्रश्नपत्रिकेत प्रत्येकी २ गुणांचे १०० प्रश्न असतील. परीक्षा पूर्ण करण्याचा कालावधी ९० मिनिटे आहे आणि परीक्षेचे माध्यम इंग्रजी आहे.

नोट - एमएएच बीएड सीईटी परीक्षेसाठी २३ मार्च २०२३ पर्यंत तर, महा-विधी ३ वर्ष सीईटीसाठी २५ मार्च २०२३ व ५ वर्ष सीईटीसाठी २३ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

महत्त्वाच्या लिंक : https://mbacet२०२३.mahacet.org

(लेखक विद्यार्थी मित्र www.VidyarthiMitra.org चे संस्थापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com