Karnataka Teacher Recruitment 2026
esakal
बेळगाव : राज्यातील सरकारी प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील १५ हजार शिक्षक पदांच्या भरतीसाठी मंगळवारपासून (ता. १८) अर्ज प्रक्रिया सुरू झाली (Karnataka 15000 teacher vacancy apply online) आहे. इच्छुक उमेदवारांना ७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. या भरतीमध्ये संगणक शिक्षक, प्राथमिक शाळा शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शाळा शिक्षक तसेच शारीरिक शिक्षण शिक्षक संवर्गातील पदांचा समावेश आहे.