
विद्यार्थिनींवर अंतर्वस्त्रे काढण्याची सक्ती; पालक संतप्त
तिरुअनंतपुरम : केरळमध्ये रविवारी (ता.१७) राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) देणाऱ्या विद्यार्थिनींना अंतर्वस्त्रे उतरविण्याची सक्ती करण्यात आल्याच्या घटनेचा राज्यभरात निषेध होत आहे. राज्य महिला आयोगाने ‘नीट’च्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. कोल्लममधील अयूर येथील मोर्थम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. उच्च शिक्षण मंत्री डॉ. आर. बिंदू यांनी निषेध नोंदविला असून केंद्र सरकारकडे तक्रार केली आहे. त्या म्हणाल्या, ‘‘अशा कृतीमुळे परीक्षार्थींचा अपमान झाला असून त्याचा परिणाम उत्तरपत्रिका लिहिण्यावर झाला.
ही अतिशय असंस्कृत पद्धत आहे. याप्रकरणी विद्यार्थिनींच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार महाविद्यालय प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत विद्यार्थिनींनी केलेले आरोप महाविद्यालयाने फेटाळले आहेत.
पित्याची व्यथा
एका मुलीचे वडिल म्हणाले, माझ्या मुलीने गेल्या वर्षीही परीक्षा दिली होती, पण या छळामुळे ती कधीच परीक्षा देणार नाही. मेटल डिटेक्टरने तपासणी केल्यावर अंतर्वस्त्रांचा धातूशी संबंध नसूनही ते काढण्याची सक्ती झाली. यामुळे विद्यार्थिनी रडल्या.
Web Title: Kerala Medical Neet Exam Forced To Remove Undergarments Female Students
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..