
तुम्हाला मुलाखतीचे हे प्रकार माहिती आहेत का? जाणून घ्या सविस्तर
मुलाखती अनेक प्रकारच्या असतात. शाॅर्टलिस्टमध्ये आल्यावर तुम्ही मुलाखतीचा आपल्या आवडीच्या पद्धतीने तर निवडू शकत नाही. मात्र रिक्रूटरकडून प्रक्रिया विचारुन तयारी करु शकता. या अगोदर तुम्हाला माहीत हवे की मुलाखतीचे किती प्रकार असतात. येथे त्याविषयी जाणून घेऊ या…
१. वन ऑन वन
- प्रथम एचआर आणि पुन्हा रिपोर्टिंग मॅनेजरबरोबर तुमचे कमीत-कमी एकेक मुलाखत होते. मुलाखतीचा पॅटर्न निश्चित आहेत, तर तुम्ही कंपनी, रिक्रूटरकडून त्याच्या फाॅर्मेट आणि कंटेण्टविषयी विचारु शकता.
२.फोन
- फोनवर होणारी मुलाखत नेहमी फेस टु फेस मीटिंगपूर्वी होतात. या उमेदवारांची शाॅर्टलिस्ट बनवली जाते. या अगोदरपासून तयारी करा आणि मुलाखतीसाठी शांत ठिकाण निवडा. तुम्हाला फोनवर एखादा प्रश्न स्पष्ट ऐकू आला नसेल तर तो पुन्हा विचारा. फोन मुलाखतीच्या वेळी रेझ्युमेही स्वतःजवळ ठेवायला हवे.
३. पॅनल
- जर मुलाखत पॅनलमध्ये निर्णय घेणारे एक किंवा त्यापेक्षा अधिक मॅनेजर आणि स्पेशलिस्ट अनेक प्रश्न विचारतील. उत्तर देताना प्रश्न विचारणाऱ्यांव्यतिरिक्त पॅनलमध्ये सहभागी दुसऱ्या लोकांकडेही पाहा. याने त्यांचे ध्यानही तुमच्यावर राहील. या मुलाखतीत एकाच प्रकारचे प्रश्न विचारले जात नाही. त्यामुळे याची चांगली तयारी करावी लागते.
४. स्काईप/ व्हिडिओ
- व्हिडिओ मुलाखत लाईव्ह किंवा रेकाॅर्डेड होऊ शकते. जर कॅमेऱ्यासमोर तुम्हाला बोलण्याची सवय नसेल तर मुलाखतीपूर्वी व्हिडिओ रेकाॅर्ड करुन त्याचा अभ्यास करा. तुमचे हावभाव, व्हिज्युएल इम्पॅक्ट, प्रेझेन्स ऑफ माईण्डचे विश्लेषण करुन त्यात सुधारणा करा.
५. ग्रुप इंटरव्यू
- ज्युनियर किंवा एंट्री लेव्हलमध्ये नेहमी मोठ्या प्रमाणावर भरती केले जातात. यासाठी ग्रुप इंटरव्यू घेतले जातात. याची तयारी मित्रांबरोबर माॅक ग्रुप इंटरव्यूच्या माध्यमातून केली जाऊ शकते. गटचर्चेत विनम्र बना. दुसऱ्यांना बोलू द्या आणि योग्य तथ्य ठेवा. पुढच्या राऊंडमध्ये जाण्यासाठी इतकी संधी खूप असते.
६. जाॅब फेअर
- जाॅब फेअरमध्ये तुम्हाला इंटरव्यु घेणाऱ्याला प्रभावित करण्यासाठी खूप कमी वेळ असतो. याच्या तयारी साठी स्टँडर्ड प्रश्नांच्या उत्तरांची प्रॅक्टिस अगोदरपासून करा. तुमच्याविषयी सांगा, अॅकॅडमिक- मागील नोकरीचा अनुभव, तुम्हाला नोकरी का द्यावी, तुम्हाला येथे नोकरी का हवी, असे प्रश्न असतात. यांची अगोदरपासून तयारी केली जाऊ शकते.
Web Title: Know All Types Of Job Interview Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..