फूड स्टायलिस्ट म्हणून करिअर करायचंय? तुमच्यासाठी 'या' संधी आहेत उपलब्ध

टीम ईसकाळ
Monday, 22 February 2021

फूड स्टायलिंग क्षेत्रात थोडी मेहनत आणि टॅलेंटच्या जोरावर तुम्ही देखील चांगले नाव कमावू शकतात. त्यासाठी या क्षेत्रातील बारकावे लक्षात घेणे आवश्यक आहे. आज आपण फूड स्टायलिस्ट बनन्यासाठी आवश्यक गोष्टीविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 

सध्या खाद्यपदार्थ बनवण्याच्या उद्योगांनी वेगळीच उंची गठली आहे. जगभरात कुठेही कोणत्याही देशातील पदार्थ सद्या विकले जात आहेत. दरम्यान या व्यावसायाच्या वाढीसोबतच फूड स्टायलिस्ट म्हणून काम करणाऱ्यांना देखील चांगले दिवस आले आहेत. काही वर्षांपुर्वी फूड स्टायलिंग हे फक्त व्हिडीओ जाहिराती, प्रिंटमध्ये येणाऱ्या जाहिराती किंवा फूड पॅकेट्स इतकंच होतं. पण जसजसे याबद्दल लोकांना माहिती होत गेली तसे हे क्षेत्र देखील चांगलेच विस्तारत गेले.

सध्या कुकिंग शिकवणारी पुस्तके, फिल्म प्रोडक्शन हाऊसेस, पब्लिशिंग हाऊसेस, हॉटेल, रेस्टॉरंट तसेच फूड रिएलिटी शो या सगळ्या ठिकाणी फूड स्टायलिस्ट लोकांची मागणी वाढली आहे. या क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. बदलत्या काळात या नव्या करिअर ऑप्शन्सकडे त्या मोठ्या प्रमाणात वळताना दिसता आहेत. फूड स्टायलिंग क्षेत्रात थोडी मेहनत आणि टॅलेंटच्या जोरावर तुम्ही देखील चांगले नाव कमावू शकतात. त्यासाठी या क्षेत्रातील बारकावे लक्षात घेणे आवश्यक आहे. आज आपण फूड स्टायलिस्ट बनन्यासाठी आवश्यक गोष्टीविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 

नेमकं फुड स्टायलिंग म्हणजे काय?

आपण टिव्हीवर बऱ्याचदा पाहातो की, जेवण वाढताना ते आकर्षक पध्दतीने वाढलेले असते. प्लेटमध्ये ठेवलेला पदार्थ सजावटीसारखा मांडलेला असतो. यामध्ये तुमच्या जीभेला चव लागण्यासोबतच अन्न डोळ्यांना देखील सुकावणारे असले पाहिजे याची काळजी घेण्यात येते. या कामात क्रिएटिव्हीटीची गरज असते. तुम्ही जेवन तयार करु शकत असालआणि सोबतच ते  प्रसेंट करण्याची कला देखील तुमच्याजवळ असेल तर तुम्ही फूड स्टायलिंग या क्षेत्रात उत्तम करिअर करु शकता. 

कोणती डिग्री  घ्यावी लागेल? 

अन्न पदार्थ प्लेटमध्ये सजवण्यासाठी काही विशेष डिग्री किंवा शिक्षणाची गरज नसते. मात्र तुम्हाला काही बेसीक गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे.  जसे की, कुठला पदार्थ कसा प्रसेंट करता येईल याची समज तुमच्याकडे असायला हवी, सोबतच तुमच्या कामात  नाविन्य  असायालाच हवे. जसे फोटो एडीट केल्यानंतर त्याच्या सौंदर्यात भर पडते. अगदी त्याच प्रकारे बनवलेल्या डिशच्या मांडणीतून त्या सुंदर पध्दतीने प्रजेंट करव्या लागतात. या स्किलसाठी तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट कोर्स देखील करु  शकता. त्या ठिकाणी तुम्हाला जेवण बनवण्यासोबतच ते प्रजेंट करणे देखील शिकवण्यात येते. 

हे सगळं कारावं लागेल

जर तुम्ही फूड स्टायलिंगमध्ये शानदार करिअर करायचे असेल तर कुलिनरी आर्ट मध्ये बेसीक माहिती तुम्हाला घ्यावीच लागेल. यातून तु्म्हाला टेक्निकल माहितीसोबतच इतर वस्तूंचा वापर फूड स्टायलिंगमध्ये कसा करता येईल याबद्दल समज येईल. त्यासोबतच हॉटेल मॅमेजमेंट डिग्री घेतली असेल तर तुम्ही फूड स्टायलिंग आणि प्रजेंटेशन या क्षेत्रात चांगले करिअर करु शकता. 

देशातील सर्वोत्तम शिक्षणाची संधी

सध्या हॉटेल मॅनेजमेंट इंस्टीट्यूट सगळीकडे उपलब्ध आहेत. अशा बऱ्याच संस्थांमध्ये हे शिक्षण दिले जाते सोबतच तुमच्या भविष्यातील करिअरसंबंधी देखील मार्गदर्शन केले जाते. यामध्ये देशात प्रसिध्द संस्था डीपीएम आई नवी दिल्ली, फूड क्राफ्ट इंस्टीट्यूट पुणे, मुंबई इंस्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग, इंदिरा गांधी नॅशनल ओपन यूनिवर्सिटी, दिल्ली असे अनेक इंस्टीट्यूट आणि कॉलेज आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know how to make successful career as food stylist Marathi story