आपल्या क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून करा फाईन आर्टस्‌मध्ये करिअर ! काय आहेत यातील फायदे? जाणून घ्या सविस्तर

Fine Art
Fine Art

सोलापूर : नैसर्गिक सौंदर्याकडे प्रत्येकजण आकर्षित होतो आणि जर नदी, धबधबा, डोंगर, जंगल अशा देखाव्यांची जाणीव झाली तर त्याहूनही अधिक आनंद होतो. निसर्गाचे सौंदर्य केवळ निर्मात्यांनाच नव्हे तर दर्शकांना देखील आकर्षित करते. म्हणून अशी चित्रे देणाऱ्या कलाकारांचे कौतुक करण्यास ते थकत नाहीत. वास्तविक, हे सर्व फाईन आर्टस्‌ (ललित कला) अंतर्गत येते. 

चित्रकला, डिझायनिंग, शिल्पकला, इन्स्टॉलेशन, ऍनिमेशन, गेमिंग आदी फाईन आर्टस्‌च्या वेगवेगळ्या विषयांत आपली कौशल्ये दर्शवून आर्टिस्ट पैसा आणि यश दोन्हीही मिळवत आहेत. गेल्या काही वर्षांत फाईन आर्टस्‌मधील यशस्वी कारकिर्दीची शक्‍यता सतत वाढत आहे. चला, या करिअरशी संबंधित अभ्यासक्रम आणि नोकरीबद्दल जाणून घेऊया... 

फाईन आर्टस्‌चे अभ्यासक्रम 
फाईन आर्टस्‌ अभ्यासक्रम सध्या बॅचलर, मास्टर आणि पीएचडी स्तरावर उपलब्ध आहेत. डिप्लोमा कोर्स एक वर्ष आहे, तर बॅचलर इन फाईन आर्टस्‌ हा चार वर्षांचा कोर्स आहे. फाईन आर्टस्‌मध्ये बीए (बॅचलर ऑफ आर्टस्‌ इन फाईन आर्टस्‌) तीन वर्षात पूर्ण होतो. मास्टर डिग्रीकरिता मास्टर इन फाईन आर्टस्‌ पदव्युत्तर पदवीसाठी दोन वर्षांचा कोर्स आवश्‍यक आहे. जर आपल्याला फाईन आर्टस्‌मध्ये पीएचडी करायची असेल तर आपल्याकडे पदव्युत्तर पदवी असणे आवश्‍यक आहे. जर आपण काम करत असाल किंवा नियमित कोर्स करण्यास अडचण येत असेल तर आपण पत्राद्वारे आणि दूरस्थ शिक्षणाद्वारे फाईन आर्टस्‌मध्ये बॅचलर पदवी अभ्यासक्रम देखील करू शकता. बॅचलर पदवीच्या पहिल्या वर्षामध्ये इंटिग्रेटेड कोर्स उपलब्ध आहे. द्वितीय वर्षातील स्पेशलायझेशनचा विषय विद्यार्थ्यांच्या योग्यतेच्या आधारे निश्‍चित केला जातो. या परीक्षा विद्यापीठाच्या वतीने घेतल्या जातात, ज्यामुळे महाविद्यालयाची मान्यता असून दुसऱ्या व तृतीय वर्षाच्या परीक्षा संबंधित महाविद्यालयाकडून घेतल्या जातात. 

या कोर्सकडून मदत कशी मिळवायची? 
फाईन आर्टस्‌ अभ्यासक्रम करून आपल्याला कला, सर्जनशीलता आणि ललित कलांच्या इतिहासातील बारकावे जाणून घेतात येतात. 20 टक्के अभ्यासक्रम थिअरी आणि 80 टक्के प्रॅक्‍टिकल असतो. 

ही कौशल्ये आहेत महत्त्वाची... 

  • क्रिएटिव्हिटी आणि सृजनशीलता महत्त्वपूर्ण आहे 
  • तयार केलेले रेखाचित्र वास्तववादी दिसते 
  • काम अचूकपणे सादर करण्याची क्षमता 
  • चित्रात कल्पनाशक्ती उतरवण्यास सक्षम 
  • विचार करण्याचा आणि काहीतरी नवीन करण्याला स्कोप 
  • रंगसंगती आणि तांत्रिक समज यांचे ज्ञान 
  • चांगल्या कम्युनिकेशनची क्षमता 
  • सर्व प्रकारच्या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म आणि नवीन तंत्रज्ञानाचे ज्ञान 

फेलोशिपचा घ्या फायदा 
या कोर्सची फी सरकारी संस्थांमध्ये फारशी जास्त नसून खासगी संस्थांमध्ये या कोर्सची फी जास्त असते. तुम्हाला फीसाठी अर्थपुरवठा करण्याची अडचण असल्यास, अनेक राष्ट्रीयीकृत बॅंका यासाठी सहज कर्ज उपलब्ध करतात. आपण फेलोशिपची सुविधा देखील घेऊ शकता. 

या क्षेत्रात आहेत अनेक संधी 
फाईन आर्टस्‌मध्ये पदवी घेतल्यानंतर आपल्याला जाहिरात कंपन्या, एजन्सी, आर्ट स्टुडिओ यांसारख्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळू शकते. येथे आपण आपली कला कार्य संग्रहालय, खासगी आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शित करू शकता. येथे बनवलेल्या डिझाईन्स व कलाकृती स्टुडिओ, लिलाव स्टोअर किंवा आर्ट अँड क्राफ्ट शोमध्ये चांगल्या किमतीला विकल्या जातात. मल्टीमीडिया, ऍनिमेशन, मोशन पिक्‍चर आणि गेमिंग उद्योगात देखील आपल्यासाठी चांगल्या संधी असू शकतात. याशिवाय तुम्ही फ्रीलान्सिंगचे कामही करू शकता. 

आपल्याला मिळू शकेल "या पोस्ट'वर काम 
फाईन आर्टस्‌ अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आपल्याकडे व्यावसायिक कंपन्यांमध्ये व्हिज्युअलायझिंग प्रोफेशनल, इलस्ट्रेटर, आर्ट क्रिटिक, आर्ट प्रोफेशनल, डिझाईन ट्रेनर, ऍनिमेटर, क्रिएटिव्ह डिझायनर, ग्राफिक डिझायनर, व्हिज्युअल डिझायनर, डिजिटल अशा विविध जॉब प्रोफाइल असू शकतात. डिझाइनर, क्रिएटिव्ह मार्केटिंग प्रोफेशनल, फ्लॅश प्रोग्रामर, टू-डी / थ्री-डी आर्टिस्ट, वेब डेव्हलपर, क्राफ्ट आर्टिस्ट, लेक्‍चरर, आर्ट टीचर, कार्टुनिस्ट, आर्ट म्युझियम टेक्‍निशियन, आर्ट कन्सर्वेटर, आर्ट डायरेक्‍टर, क्रिएटिव्ह डायरेक्‍टर, ऍडव्हर्टायझिंग एक्‍झिक्‍युटिव्ह / सुपरवायझर / हेड, प्रोजेक्‍ट ऑफिसर अशा पदांवर कामे मिळू शकतात. 

ही असणार आपली कार्यस्थाने 
फाईन आर्टस्‌च्या विद्यार्थ्यांना फॅशन हाउस, पब्लिशिंग हाउस, टेलिव्हिजन इंडस्ट्री, शैक्षणिक संस्था, ऍनिमेशन इंडस्ट्री, मासिके, सॉफ्टवेअर कंपन्या, डिझाइन फर्म, वस्त्रोद्योग, जाहिरात कंपन्या, डिजिटल मीडिया आणि आर्ट स्टुडिओमध्ये सर्वाधिक मागणी आहे. 

इतका मिळू शकतो पगार 
या क्षेत्रात सुरवातीला तुम्हाला महिन्याला 15 ते 25 हजार रुपये पगार मिळू शकतो. प्रकाशन किंवा जाहिरात एजन्सीमध्ये काम करू इच्छिणाऱ्या महिलांना वर्षाकाठी 4 ते 5 लाख रुपयांचे पॅकेज मिळू शकते. स्वतंत्ररीत्या काम करणाऱ्यांना प्रकल्पानुसार चांगली कमाई होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com