कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने (KSEAB) सोमवारी (ता. २) दोन्ही इयत्तांसाठी पहिली वार्षिक परीक्षा-२०२५ चे हंगामी वेळापत्रक जाहीर केले.
बंगळूर : २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठीची बारावीची (द्वितीय पीयूसी) यंदाची पहिली वार्षिक परीक्षा १ ते १९ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे, तर दहावीची (SSLC Exam) परीक्षा २० मार्च ते २ एप्रिलदरम्यान होणार आहे.