
काही दिवसांपूर्वीच Amazon आणि Meta नं आपल्या कर्मचार्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली होती.
Layoffs News : नोकरी देणारी 'ही' कंपनी 2,200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार!
Layoffs in Job Search Platform : आता 'जॉब सर्च प्लॅटफॉर्म' उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीचाही टाळेबंदीच्या यादीत समावेश झाला आहे.
ही कंपनी आपल्या 2,200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. कंपनीनं सांगितलंय की, ती तिच्या एकूण कर्मचार्यांपैकी 15 टक्के कर्मचारी कमी करणार आहे.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, या कंपनीनं कोविड महामारीदरम्यान (Coronavirus) अनेक लोकांना कामावर घेतलं होतं. परंतु, आता ही कंपनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची तयारी करत आहे. मोठ्या संख्येनं कर्मचार्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखत आहे.
यूएस-आधारित जॉब सर्च प्लॅटफॉर्मनं हा निर्णय घेतलाय. कंपनीचे सीईओ ख्रिस होम्स म्हणाले, 'काही कर्मचाऱ्यांच्या पगारात 25 टक्के कपात केली जाऊ शकते. कोविड महामारीच्या काळात नोकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, आता कंपनीला तोटा सहन करावा लागत आहे.'
कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार
Indeed's blogpost नुसार, प्रभावित कर्मचार्यांना जानेवारी ते मार्च बोनस, महिन्याचा नियमित पगार आणि मानसिक आरोग्य सेवांमध्ये प्रवेश मिळणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना पगार, बोनस आणि इतर गोष्टी दिल्या जाणार आहेत.
अमेरिकेत बँकिंग संकट
अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रात आर्थिक मंदी कायम आहे. याठिकाणी चार बँका बुडाल्या असून त्यांना सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याच वेळी, कॉर्पोरेट क्षेत्रात मोठ्या संख्येनं कर्मचारी कामावरून काढले जात आहेत. मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत.
काही दिवसांपूर्वीच Amazon आणि Meta नं आपल्या कर्मचार्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली होती. Amazon 9 हजार कर्मचार्यांना काढून टाकेल, तर Facebook Meta 10 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकणार आहे.