
पुणे : शिक्षण व्यवस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि शिक्षक सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी लीडरशिप फॉर इक्विटी (एलएफई), टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) आणि बजाज फिनसर्व्ह यांच्या संयुक्त विद्यमाने ‘साधना फेलोशिप २०२५’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पात्र उमेदवारांकडून ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविले आहेत, अशी माहिती ‘एलएफई’चे सहसंस्थापक सिद्धेश शर्मा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर बानुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.