करिअर वेध : फ्रंटफूट आणि बॅकफूट

क्रिकेटमधील फ्रंटफूट-बॅकफूट शॉट्सचा आधार घेत दैनंदिन आयुष्यातील आग्रही व मवाळ वर्तनाचा समतोल कसा साधावा, यशासाठी योग्य वेळी पुढे येणे आणि मागे सरकणे का गरजेचे आहे याचा वेध
आयुष्याच्या खेळात कधी 'फ्रंटफूट' तर कधी 'बॅकफूट'! करिअर मार्गदर्शक विनायक द्रविड यांनी उलगडले यशाचे क्रिकेटिंग तंत्र

आयुष्याच्या खेळात कधी 'फ्रंटफूट' तर कधी 'बॅकफूट'! करिअर मार्गदर्शक विनायक द्रविड यांनी उलगडले यशाचे क्रिकेटिंग तंत्र

Sakal

Updated on

विनायक द्रविड, करिअर मार्गदर्शक व ट्रेनर

या भूतलावर प्रत्येक माणूस वेगळा आहे, असे म्हटले जाते आणि ते शंभर टक्के खरे आहे. देवाने प्रत्येक माणसाला वेगळे बनविले आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, देहबोली वेगळी, स्वभाव वेगळा, आहार वेगळा, संस्कार वेगळे, शरीरयष्टी वेगळी. कोणी खूप शांत, कोणी खूप तापट स्वभावाचा कोणी थंड कोणी भडक इत्यादी. या विविध गुणदोषांमुळे प्रत्येक माणूस समोरच्याशी कसे वर्तन करतो ते ठरते. अनेकदा असे पाहायला मिळते की, काही लोक कायम आग्रही, चिडलेले आणि वरच्या पट्टीत बोलतात त्यांना आपण कायम फ्रंटफूटवर आलेली लोकं असे म्हणायला हरकत नाही. याउलट काहींचा स्वभाव खूप शांत, मवाळ आणि कोणाच्या अध्यात ना मध्यात असा असतो. त्यांना बॅकफूटवरची माणसं म्हणायला हरकत नाही. खरे तर फ्रंटफूट आणि बॅकफूट हे दोन्ही क्रिकेटमधले स्ट्रोक्स आहेत. परंतु याचा अर्थ आपल्या रोजच्या जीवनाशीही तितकाच निगडित आहे. कसे ते पाहूयात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com