- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
प्रत्येकाला आपल्या जीवनाचे उद्दिष्ट काय आहे हे माहीत असावे. स्वतःला अंतिम उद्दिष्टाचा उलगडा होत नाही तोपर्यंत कितीही प्रयत्न अपुरे असतात. एकदा आपले उद्दिष्ट निश्चित झाली की त्याला गाठण्यासाठी लहान लहान टप्प्यामध्ये विभाजित करून त्यादृष्टीने लागणारी कौशल्ये, कला, अभ्यास-विकसित करू शकतो. उद्दिष्टे स्पष्ट नसतील तर गाठायचे काय आणि तयारी कशाची करायची हा प्रश्न नेहमी खास करून अपयश पदराशी पडते त्यावेळी जास्त पडतो.