
नोकरी शोधताय?... खासगी कंपनीऐवजी आता सरकारी नोकरी हवी आहे? असे असेल तर सध्या उत्तम संधी निर्माण झाली आहे.
नोकरी शोधताय?
पुणे - नोकरी शोधताय?... खासगी कंपनीऐवजी आता सरकारी नोकरी हवी आहे? असे असेल तर सध्या उत्तम संधी निर्माण झाली आहे. पदवीधरांसाठी विविध विभागांमध्ये सुमारे २५०० हून अधिक जागांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
पदभरती करणारी संस्था, एकूण जागा व मुदत
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाइन (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची तारीख १४ मेपर्यंत
भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या सहायक पदांच्या ४६२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख - १ जून
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या १०४४ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख - ६ जून
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी लिपिक पदांच्या १९५ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख - २५ मे
पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या आस्थापनेवरील आरोग्यसेविका पदाच्या ८८ जागा भरण्यासाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येणार आहेत. मुलाखतीची तारीख १७, १८ व १९ मे २०२२. मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
पनवेल महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अधिपरिचारिका, एलएचव्ही आणि आरोग्यसेविका पदाच्या १७५ जागा भरण्यासाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलाखतीची तारीख १८, १९ व २० मे २०२२. मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील कार्यक्रम समन्वयक, लसीकरण फील्ड मॉनिटर आणि स्टाफ नर्स पदांच्या ४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठविण्याचा पत्ता - कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक. अर्ज करण्याची शेवटची तारीख - १३ मे.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी संचालक, मुख्य महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आणि सहायक अभियंता पदांच्या २२३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाइन मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख - २४ मे.
या पदांसह इतर पदांच्या संधी निर्माण झाल्या आहेत. या सर्व पदांची माहिती ऑनलाइन उपलब्ध आहे.
Web Title: Looking For A Job
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..