आधी वडील गमावले नंतर जॉब! अ‍ॅमेझॉनच्या एका निर्णयानं भारतीय इंजिनिअरवर कोसळला दुःखाचा डोंगर : Amazon Layoffs | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amazon

Amazon Layoffs : आधी वडील गमावले नंतर जॉब! अ‍ॅमेझॉनच्या एका निर्णयानं भारतीय इंजिनिअरवर कोसळला दुःखाचा डोंगर

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अॅमेझॉन कंपनीनं जगभरात कर्मचारी कपात सुरु केली आहे. भारतातही मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. यामुळं एक टक्का कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे. भारतातील सॉफ्टवेअर इंजिनिअर ओमप्रकाश शर्मा याचा अॅमेझॉनच्या निर्णयाचा मोठा फटका बसला आहे. कारण काही दिवसांपूर्वीच त्यानं आपले वडील गमावले त्यानंतर आता त्याला आपला जॉबही गमवावा लागला आहे. (Lost my father and now job Indian software engineer who worked at Amazon for 5 years gets laid off)

हेही वाचा: Modi Govt: "मोदी सरकारनं रचला पुलवामा, उरी हल्ल्याचा कट"; 'या' नेत्याच्या आरोपांनी खळबळ

नव्या जॉबच्या शोधात असलेल्या ओमप्रकाश शर्मा यानं लिंक्डइनवर त्यानं आपली व्यथा मांडली आहे. त्यानं म्हटलं की, "११ जानेवारी रोजी मला कामावरुन कमी करण्यात आलं. त्यामुळं आता मी नव्या संधीच्या शोधात आहे. अॅमेझॉननं नोकरीवरुन कमी केल्यानं माझं खूपच मोठनं नुकसान झालं आहे कारण काही महिन्यांपूर्वीच माझ्या वडिलांचा मृत्यू झाला त्यानंतर आता मी जॉब गमावला आहे."

हेही वाचा: Satyajeet Tambe : सुधीर तांबेंनंतर सत्यजीत तांबेंचही होणार निलंबन? हायकमांडच्या महत्वाच्या सूचना

सन २०२२ हे वर्ष माझ्या जीवनातील अत्यंत आव्हानात्मक वर्ष राहिलं आहे. आधी मी माझे वडील गमावले त्यांना दोन-तीन महिने आयसीयुमध्ये रहावं लागलं. याकाळात मी साधारान ४ महिने वर्क फ्रॉम होम केलं. त्यानंतर आता ११ जानेवारी रोजी अॅमेझॉननं कर्मचारी कपात केली त्यात माझानी नंबर लागला. मी गेल्या पाच वर्षांपासून अॅमेझॉनमध्ये काम केलं आहे. हा माझ्या जीवनातील सर्वाच चांगला काळ होता. मी माझं काम मनापासून एन्जॉय करत होतो. या काळात मी कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक धडे गिरवले. या काळात मला पाठिंबा देणाऱ्यांचे मी आभार मानतो, असंही शर्मा यानं म्हटलं आहे.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

अॅमेझॉननं जगभरातून १ लाख कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे. यामध्ये भारतातील १००० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळं भारतात अॅमेझॉनच्या लेऑफचा १ टक्के फटका बसला आहे. या १००० कर्मचाऱ्यांमध्ये अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्यानं त्यांच्यासमोर आता नवा रोजगार शोधण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

टॅग्स :jobsjobAmazon