
LPU (Lovely Professional University) साठी 2025 वर्षाची सुरुवात यशस्वी झाली आहे. कारण बी.टेकच्या अंतिम वर्षाच्या एका विद्यार्थ्याने तब्बल 1.03 कोटी ($1,18,000) प्लेसमेंट पॅकेज मिळवले आहे. बेडीरेड्डी नागा वामसी रेड्डी असे त्याचे नाव आहे. जो सध्या रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमध्ये बी.टेकचे शिक्षण घेत आहे. तो मे 2025 मध्ये पदवीधर होणार असून त्याला रोबोटिक्स अभियंता म्हणून अग्रगण्य AI रोबोटिक्स फर्ममध्ये सहभागी होण्यासाठी ऑफर मिळाली आहे. त्याची ही कामगिरी गौरवास्पद आहे. देशातील आघाडीच्या कंपन्यांसाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळ पुरवण्यात LPU चे असलेले उच्च स्थान यातून अधोरेखित झाले आहे.