Medical Study : आता हिंदीत शिका MBBS, 'या' राज्याने उचललं पहिलं पाऊल

सप्टेंबरच्या अखेरीस सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रापासून याची सुरुवात होऊ शकते.
MBBS Student
MBBS Studentsakal

MBBS Education In Hindi : हिंदी भाषिक विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणे आता सोपे होणार आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर मध्य प्रदेशातील एमबीबीएस अभ्यासक्रमात हिंदी भाषा पर्यायी माध्यम बनणार आहे. सप्टेंबरच्या अखेरीस सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रापासून याची सुरुवात होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात असून, अशा प्रकारे एमबीबीएसचे शिक्षण हिंदीत शिकवणारे मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की, नवीन शैक्षणिक सत्रात खासगी आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या एमबीबीएस प्रथम वर्षाच्या एकूण चार हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी तसेच हिंदी पुस्तकांमधून अभ्यासाचा पर्याय उपलब्ध होऊ शकणार आहे. संबंधित समितीचे सदस्य आणि फिजियोलॉजीचे माजी सहयोगी प्राध्यापक डॉ. मनोहर भंडारी यांनी सांगितले की, राज्यात एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे 60 ते 70 टक्के विद्यार्थी हिंदी माध्यमातील आहेत.

पुस्तके तयार :

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाच्या तीन प्रस्थापित इंग्रजी लेखकांच्या पुस्तकांचे हिंदीत भाषांतर करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. नवीन सत्रापासून विद्यार्थ्यांना ही पुस्तके मिळू शकतात.

मध्य प्रदेशात सप्टेंबर सत्रापासून होणार सुरुवात

इंदूरमध्ये प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यासंबंधी घोषणा केली होती. त्यानंतर आता हे प्रत्यक्षात आणण्याच्या हालचालींना वेग आला असून, हिंदीमध्ये MBBS देणारे मध्य प्रदेश हे पहिले राज्य ठरणार आहे. यासाठी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांचे भाषांतराचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. जरी सप्टेंबरपासून हिंदीमध्ये शिक्षण दिले जाणार असले तरी, राज्यात वैद्यकीय शिक्षण पूर्वीप्रमाणेच इंग्रजीतूनही सुरू राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com