
Maharashtra 10th Result: नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाही मुलींनी मुलांपेक्षा अधिक यश संपादन करत बाजी मारली आहे. निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांपेक्षा जास्त प्रश्न पालकांच्या मनात आहेत "आता पुढे काय?" मुलाच्या करिअरचा योग्य मार्ग निवडण्यात असताना अनेक पालकांचा गोंधळ उडतो. याच प्रश्नावर करिअर तज्ज्ञ विवेक वेलणकर यांनी मार्गदर्शन केले आहे.