Eleventh Admission : अकरावीच्या प्रवेशासाठी राज्यातून १२ लाख ७१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी; गुणवत्ता यादी मंगळवारी होणार जाहीर
इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत राज्यातील नऊ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी तब्बल १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.
पुणे - इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत राज्यातील नऊ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी तब्बल १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यातील ११ लाख २९ हजार ९२४ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग दोन लॉक केला आहे.