Maharashtra Board HSC Exam Schedule 2026
sakal
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे येत्या सोमवारपासून (ता. १२) उपलब्ध होणार आहेत. सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर सोमवारपासून उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी प्रकटनाद्वारे दिली आहे.