Exam Rotation : अदलाबदलीच्या निर्णयावर मंडळ ठाम; यंदाच्या परीक्षेला ‘पर्यवेक्षण टीम रोटेशन’ होणारच, केंद्रांची चाचपणी सुरू
Maharashtra Education : महाराष्ट्र शालेय परीक्षा मंडळाने यंदाच्या परीक्षेसाठी पर्यवेक्षक व शिपाई यांची अदलाबदली करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला शिक्षक संघटनांनी विरोध करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे, तरीही मंडळ ठाम आहे.
छत्रपती संभाजीनगर : शालांत माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा कॉपीमुक्त व सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक व शिपाई यांच्या अदलाबदलीचा निर्णय मंडळाने घेतला. या निर्णयाला शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांनी विरोध केला.