
Maharashtra CET PCB Result 2025: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (MHT CET) 2025 चा PCB गटाचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला असून यामध्ये एकूण 93.91% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ही परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसाठी घेण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही या परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.