
१२ जूनपासून CET; पाहा... तुमची प्रवेश परीक्षा कधी ?
मुंबई : JEE, NEET यांसारख्या केंद्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांमुळे महाराष्ट्रातील सामायिक प्रवेश परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १२ जून ते ११ सप्टेंबर या कालावधीत या परीक्षा होणार आहेत.
महाराष्ट्रात विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सीईटी कक्षामार्फत सामायिक प्रवेश परीक्षा (MHT-CET) घेतली जाते. यंदा या परीक्षांच्या तारखा केंद्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसोबतच येत होत्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंंत्री उदय सामंत यांनी केली होती. त्यानंतर आता या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर झाल्या आहेत.
हेही वाचा: राज्याची सीईटी परीक्षा लांबणीवर
दृश्यकला पदवी व डिझाईन या अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी MAH-AAC-CET १२ जूनला होणार आहे. BPed, Med, BedMed (तीन वर्षे एकात्मिक अभ्यासक्रम), law (५ वर्षे), M.HMCT, M.Arch या अभ्यासक्रमांसाठी २ ऑगस्टला प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. MCAची प्रवेश परीक्षा ४ आणि ५ ऑगस्टला होणार आहे. ३ वर्षे विधी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा ३ व ४ ऑगस्टला होणार आहे. तसेच ४ ऑगस्टला बीए-बीएड, बीएसस्सी-बीएड या ४ वर्षे एकात्मिक अभ्यासक्रमांची आणि B.planning या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा होणार आहे.
बीएडची प्रवेश परीक्षा २१ व २२ ऑगस्टला आणि एमपीएड आणि B.HMCT या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा २१ ऑगस्टला होणार आहे. २३, २४ आणि २५ ऑगस्टला MBA, MMS या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा होतील. ५ ते ११ ऑगस्ट दरम्यान प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची आणि १२ ते २० ऑगस्ट दरम्यान प्रथम वर्ष औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा होणार आहे. भौतिकोपचार, व्यवसायोपचार, speech language pathology, प्रोस्थोटिक्स अॅण्ड ऑर्थोटिक्स या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा ११ सप्टेंबरला होणार आहेत. सर्व परीक्षांचे वेळापत्रक http://mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Web Title: Maharashtra Cet Timetable Out For 2022 23
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..