
Maharashtra Board HSC Result: फेब्रुवारी ते मार्च 2025 दरम्यान झालेल्या बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर, विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडे लागले होते. ही परीक्षा करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्यानं, निकालाच्या तारीखसाठी सर्वजण उत्सुक होते. परंतु, आता प्रतीक्षा संपली आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार असल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.