
HSC Result : १२ वीच्या निकालानंतर रिचेकिंगची प्रोसेस काय? जाणून घ्या
HSC Result 2022 : बारावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट दिली आहे. कोरोनानंतर झालेल्या बारावीच्या परीक्षांमुळे यंदाच्या निकालाची सगळेच उत्सुकतेने वाट पाहात आहेत. या दरम्यान उद्या जाहीर झाल्यानंतर निकालाबाबत काही विद्यार्थ्यांना अडचणी असू शकतात, तुम्हाला निकालानंतर गुणपडताळणी करायची असेल किंवा उत्तर पत्रिकांची झेरॉक्स हवी असल्यास तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.. (HSC result know the process for rechecking supplementary exam photocopy of answer sheet)
ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ बी) परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांना मिळालेल्या गुणांची गुणपडताळणी (Mark Recheck) व उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स, पुनर्मूल्यांकन (Recheck) व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी (TC) संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://Verification.mh-hsc.ac.in ) स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्धकरून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी/शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.
दरम्यान गुणपडताळणीसाठी शुक्रवार, दिनांक १० जून ते सोमवार, दिनांक २० जून पर्यंत व उत्तरपत्रीकांच्या कॉपीसाठी शुक्रवार, दिनांक १० जून ते बुधवार, दिनांक २९ जून पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/ Credit Card/UPI/Net Banking) याद्वारे भरता येईल.
मार्च-एप्रिल २०२२ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची कॉपी घेणे अनिवार्य असून ती मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठीच्या प्रोसेसनुसार ठराविक शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकक करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.
मार्च-एप्रिल २०२२ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस सर्व विषयांसह उत्तीर्ण होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांसाठी दोन संधी उपलब्ध राहतील.
पुरवणी परीक्षा
जुले-ऑगस्ट २०२२ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दिनांक १०/६/२०२२ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीनेअर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे काढण्यात येईल.
तसेच मार्च-एप्रिल २०२२ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ१२ वी) परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शुक्रवार दि.१७/६/ २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता वितरित करण्यात येतील.
Web Title: Maharashtra Hsc Result Know The Process For Rechecking Supplementary Exam Photocopy Of Answer Sheet
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..