नागपूर मेट्रोमध्ये बंपर भर्ती, महिन्याला मिळेल २ लाख पगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jobs

नागपूर मेट्रोमध्ये बंपर भर्ती, महिन्याला मिळेल २ लाख पगार

नागपूर : रेल्वेमध्ये काम करून इच्छिणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (maharashtra metro rail corporation) अंतर्गत नागपूर मेट्रोमध्ये अनेक (recruitment in nagpur metro) पदांची भरती केली जात आहे. मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अतिरिक्त जनरल व्यवस्थापक, उप व्यवस्थापक अशा अनेक पदांची भरती केली (metro job alert) जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांना भरघोस पगार देखील मिळणार आहे. इच्छुक उमेदवार २८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.

हेही वाचा: रिझर्व्ह बॅंकेतील 'हे' पद म्हणजे सर्वाधिक पगाराची सरकारी नोकरी!

नागपूर मेट्रोमध्ये भरली जाणारी एकूण पदे - २८

पदाचे नाव - Chief Project Manager, Additional General Manager, Joint Chief Project Manager, Joint General Manager, Senior Deputy General Manager, Deputy General Manager

काय असेल पात्रता?

नागपूर मेट्रोलमध्ये ज्या पदांची भरती केली जात आहे, त्यासाठी संबंधित शाखेत अभियांत्रिकीची पदवी असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा -

कमीत कमी १९ वय असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात, तर ५० वर्षांपर्यंत ही वयोमर्यादा आहे.

वेतनश्रेणी -

अभियांत्रिकी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. कारण नागपूर मेट्रोच्या या पदभरतीमध्ये गलेलठ्ठ पगार दिला जाणार आहे. ६० हजार रुपये ते २ लाख रुपये प्रति महिना इतका पगार मिळणार आहे.

परीक्षा शुल्क : सर्वसाधारण आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४०० रुपये परीक्षा शुल्क असून अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. यासाठी www.mahametro.org या वेबसाईटवरून ऑनलाइन अर्ज देखील करू शकता. तसेच खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता.

पत्ता : To, Metro-Bhawan, Maharashtra Metro Rail Corporation Limited, UIP Road, Near Dikshabhomi, Ramdaspeth, Nagpur-440010

loading image
go to top