esakal | राज्यात एक कोटी विद्यार्थ्यांचा ‘स्वाध्याय’
sakal

बोलून बातमी शोधा

Good news for first and second year college students

राज्यात एक कोटी विद्यार्थ्यांचा ‘स्वाध्याय’

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : कोरोना (corona) काळात विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहावेत यासाठी राज्याच्या शिक्षण विभागामार्फत (department of education) नवीन शैक्षणिक वर्षांत १७ जुलैपासून स्वाध्याय उपक्रम राबविण्यात येत आहे. पहिल्या आठवड्यात या उपक्रमाला अल्प प्रतिसाद मिळाला होता. मात्र, दुसऱ्या आठवड्यानंतर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. राज्यात सातारा (satara) जिल्हा नोंदणीत आघाडीवर असून मुंबई (mumbai) शहर अद्याप तळालाच असल्याचे दिसते. मराठवाड्यातून औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. (Maharashtra One Crore Student Swadhyay)

शिक्षण विभाग व राज्य शैक्षणिक संशोधन, प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) यांच्यामार्फत ‘स्टुडंट व्हॉट्सअॅप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट’ (स्वाध्याय) उपक्रम तीन नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आला आहे. यामध्ये व्हॉट्सअॅपद्वारे विद्यार्थ्यांना सरावासाठी स्वाध्याय दिला जातो.

या उपक्रमाअंतर्गत पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोबाईलवर प्रश्नमंजूषा उपलब्ध करून दिली आहे. दर शनिवारी गणितातील दहा आणि भाषेतील दहा प्रश्‍न सरावासाठी पाठवले जातात. त्याद्वारे उत्तरे पाठविल्यावर विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता शिक्षकांना समजते.

हेही वाचा: इम्पिरिकल डेटासाठी याचिका - छगन भुजबळ

'कोरोनाकाळात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी हा उपक्रम राज्यभर राबविला जात आहे. एक कोटी विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा,' असे प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबादचे संचालक डॉ. कलिमोद्दीन शेख यांनी सांगितले.

विभागनिहाय टॉप जिल्हे अन् विद्यार्थिसंख्या

loading image
go to top