Maharashtra Talathi Bharati : प्रतिक्षा संपली, तलाठी भरती प्रक्रिया सुरु होणार लवकरच l Maharashtra Talathi Bharti 2023 advertisment job oprortunity | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Talathi Bharati

Maharashtra Talathi Bharati : प्रतिक्षा संपली, तलाठी भरती प्रक्रिया सुरु होणार लवकरच

Maharashtra Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीची बरेच जण आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याविषयीचे वेगवेगळे अपडेट्स मिळत राहतात. साडे तीन ते साडे चार हजार पदे भरली जातील असे सतत कळवले जाते. पण अधिकृत शासन निर्णयानुसार ही पदे भरण्यासाठीची जाहिरात काही प्रसिद्ध होत नाही. ही जाहिरात जानेवारी अखेरपर्यंत येणं अपेक्षित होतं. पण अंतर्गत व शासकीय कामांमुळे जाहीरात येण्यास उशीर होत आहे.

ही भरती ऑगस्ट 2023 पर्यंत पुर्ण होणार आहे. यासंदर्भातील अधिकृत जाहिरात मार्च महिन्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांनी आता तयारीला लागायला हवे. जाहिरातीपूर्वी आवश्यक माहिती जाणून घ्या.

विभागानुसार पदसंख्या

  • नाशिक – 803 जागा

  • औरंगाबाद – 799 जागा

  • कोकण – 641 जागा

  • नागपूर – 550 जागा

  • अमरावती – 124 जागा

  • पुणे – 702 जागा

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.

  • MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

  • मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक

किमान वयोमर्यादा

  • १८ ते ३५ वर्षे

  • खेळाडूंना ५ वर्षे सूट

  • प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/अपंग यांच्यासाठी ७ वर्षे सूट असेल.