Maharashtra TET 2025: महाराष्ट्र राज्य शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) २०२५ निकाल १८ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. राज्यातील २६ जिल्ह्यात दोन लाख २८ हजार उमेदवारांनी परीक्षेस नोंदणी केली होती.
छत्रपती संभाजीनगर : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) परीक्षा- २०२५ चा निकाल सोमवारी (ता. १८) प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.