खेलेगा इंडिया... : प्रशिक्षकाची जागरूकता

लहानपणी किंवा किशोरवयात शरीराला अनेकदा प्रशिक्षणाच्या ताणामुळे काही आव्हानांना सामोरे जावे लागते.
Trainer
Trainersakal
Summary

लहानपणी किंवा किशोरवयात शरीराला अनेकदा प्रशिक्षणाच्या ताणामुळे काही आव्हानांना सामोरे जावे लागते.

- महेंद्र गोखले

लहानपणी किंवा किशोरवयात शरीराला अनेकदा प्रशिक्षणाच्या ताणामुळे काही आव्हानांना सामोरे जावे लागते. पालकांनी खेळाडूंना ताण जाणवणार नाही याकडे आणि त्यांच्या आहारावर लक्ष ठेवले पाहिजे. उत्साही आणि ध्येयवादी खेळाडूंमध्ये भावनिक अडथळे आणि चॅम्पियनशिप गमावल्यामुळे नैराश्य येऊ शकते. अशा परिस्थितीत खेळाडूंना मदत करण्याचे प्रशिक्षण प्रशिक्षकाने घेतलेले असावे किंवा त्यांनी पालकांना क्रीडा मानसोपचार तज्ज्ञाकडे पाठवावे. प्रत्येक खेळाडू त्याच्या निश्चयामुळे आणि कितीही तास प्रशिक्षण केल्याने उच्च स्तरावर पोहोचत नाही. त्यामुळे एका जबाबदार प्रशिक्षकाने प्रथम या सत्याची जाणीव खेळाडूला करून द्यावी. तसेच त्याच्यामध्ये त्याचा खेळ, व्यायाम याबद्दल प्रेम निर्माण करावे ज्यामुळे तो खेळाडू आजीवन खेळ आणि व्यायाम या गोष्टी मनापासून करत राहील. आयुष्यात त्याचा वास्तववादी आणि निरोगी दृष्टिकोन तयार होईल.

यशस्वी स्पर्धेसाठी मूलभूत तत्त्वांचे प्रशिक्षण दिले पाहिजे. यासाठी योग्य वय आणि स्तर याबरोबरच योग्य कौशल्य यांचा विकास करून तंत्र, नियम, वर्तणुकीचे शिष्टाचार, आणि खेळाची रणनीती शिकवणे गरजेचे आहे. खेळासाठी आवश्यक असणारे कोचिंग, सर्व प्रकारचे ट्रेनिंग, खेळाची नैतिकता ही खेळाडूंना लहान वयापासून शिकवणे गरजेचे आहे. या प्रकारचे प्रशिक्षण हा खेळाच्या प्रशिक्षणाचा मजबूत पाया आहे.

दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या खेळाडूंना स्ट्रेंथ प्रशिक्षण सुरू करणे सुरक्षित असते. चांगला प्रशिक्षक खेळाडूला पवित्रा, फॉर्म आणि तंत्र या मूलभूत गोष्टी प्रथम शिकवेल. खेळाचे प्रशिक्षण म्हणजे मुलांना दमवणे नव्हे. प्रशिक्षणाचा उद्देश मुलांना दमवणे हा नसावा. संयमी आणि ज्ञानी प्रशिक्षक खेळाडूंना योग्यरीत्या शिकवतो आणि सामान्य लोकांपासून वेगळे ठेवतो.

भारतात बहुसंख्य पालक क्रीडा बायोमेकॅनिक्सची तत्त्वे विचारात घेत नाहीत कारण ती तत्त्वे तरुण खेळाडूंच्या शरीरांना लागू होतात. मुलाने त्यांच्या आवडीच्या खेळासारखे प्रशिक्षण घेतले पाहिजे अशी त्यांची इच्छा असते. कोणत्याही स्पर्धात्मक खेळामुळे शरीरावर ताण येतो. जाणकार प्रशिक्षक अशा ताणासाठी शरीराला तयार करण्याची गरज ओळखतो आणि योग्य वेळेला किंवा टाइमलाइनवर प्रशिक्षण आणि कौशल्यविकास सहज शक्य करतो.

खेळाडूंना व्यक्ती म्हणून आणि संघाचा सदस्य म्हणून जाणून घेणे तसेच प्रत्येकजण नवीन कार्ये आणि कौशल्ये कशी शिकतो किंवा आत्मसात करतो हे पाहणे महत्त्वाचे असते. या गोष्टीला वेळ लागतो त्यामुळे वेळ, संयम आणि विश्वास ठेवावा लागतो. परंतु प्रयत्न करणे नक्कीच योग्य आणि आवश्यक आहे. केवळ या पद्धतीनेच एक खरा लीडर त्याच्या संघाला कशामुळे सर्वात चांगली प्रेरणा मिळते आणि कशामुळे प्रत्येक खेळाडू त्याच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोचू शकतो हे ओळखू शकतो.

संघ बांधणीच्या प्रक्रियेमध्ये खेळाडू एकमेकांशी जोडले जातात. यामधूनच प्रत्येक खेळाडूमध्ये आधार देण्याघेण्याची जाणीव निर्माण होते. यशस्वी युवा प्रशिक्षक किंवा कोच खेळाडूंमध्ये आत्मविश्वास आणि एकी वाढवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधतात. असा प्रशिक्षक प्रत्येक खेळाडूला त्याच्या ‘आतला आवाज’ शोधण्यात आणि त्याच्या सामर्थ्याच्या अंतिम क्षमतेपर्यंत पोहोचण्यास मदत करतात. प्रशिक्षकांनी मुद्दाम वेळ काढून पालकांची भेट घ्यावी ज्यामुळे पालकांचा कोच वरचा विश्वास वाढतो. तसेच प्रशिक्षकाने कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय पालकाशी संवाद साधावा आणि त्यांच्या मुलाच्या क्षमतेसाठी योग्य त्या दिशेने त्यांना नेहमीच मार्गदर्शन करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com