खेलेगा इंडिया... : महत्त्व क्रीडा प्रशिक्षण सर्टिफिकेटचे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yoga

आपल्याला खेळाचे कोचिंग महत्त्वाचे वाटत असल्यास कोचिंग सर्टिफिकेशनचे महत्त्व जाणले पाहिजे. प्रशिक्षक म्हणून खेळाडूंची कामगिरी वाढवण्यासाठी आणि प्रभावी मार्गदर्शन करण्यासाठी अनुभव आणि ज्ञान वापरतो.

खेलेगा इंडिया... : महत्त्व क्रीडा प्रशिक्षण सर्टिफिकेटचे...

- महेंद्र गोखले

आपल्याला खेळाचे कोचिंग महत्त्वाचे वाटत असल्यास कोचिंग सर्टिफिकेशनचे महत्त्व जाणले पाहिजे. प्रशिक्षक म्हणून खेळाडूंची कामगिरी वाढवण्यासाठी आणि प्रभावी मार्गदर्शन करण्यासाठी अनुभव आणि ज्ञान वापरतो. प्रशिक्षकांचे शिक्षक देखील नेमके हेच करतात. तरीही, अनेकदा प्रशिक्षक म्हणतात, की एखादा व्यावसायिक शिक्षक मला जे शिकवू शकेल त्यापेक्षा मी स्वयंशिक्षितपणे आणि तरीही प्रभावीपणे स्वतःला तयार करू शकतो.

भारतात अनेक क्रीडा-प्रशिक्षक कोचिंग करण्यासाठी प्रमाणित नाहीत, ते प्रशिक्षण देतात कारण त्यांनी त्यांच्या तरुणपणात खेळ खेळला आहे, परंतु ते प्रशिक्षकासाठी आवश्यक असलेली सर्व कौशल्ये पूर्ण करत नाहीत. सर्वच चांगले खेळाडू चांगले प्रशिक्षक होऊ शकत नाहीत. कोचिंग प्रशिक्षण आहे; कला आणि विज्ञानही आहे. सर्व क्रीडा संघटनांनी किंवा फेडरेशननी प्रशिक्षित कोचेस् नियुक्त करणे अत्यंत आवश्यक आहे किंवा त्यांच्या कोचेसना नामांकित प्रशिक्षणसंस्थेकडून प्रमाणपत्र मिळवण्याची संधी देऊ करणे गरजेचे आहे.

तुम्ही हा लेख वाचत आहात, त्याअर्थी कोचिंग सर्टिफिकेशन ही संकल्पना तुम्हाला मान्य आहे. त्यातील महत्त्वाच्या गोष्टा पाहू.

तुमच्या वेळ, पैसा आणि ऊर्जेचे महत्त्व

तुम्ही औपचारिक कोचिंग सर्टिफिकेशन घेण्यावर भर देता, तेव्हा तुम्ही स्वतःला आणि इतरांना हे दाखवता, की तुम्ही या क्षेत्रात व्यावसायिक विकास व्हावा ह्या दृष्टीने पावले उचलत आहात.

औपचारिक शिक्षणासाठीचा खर्च जास्त जाणवतो, परंतु स्वयं-शिक्षणासाठीच्या खर्चाकडे दुर्लक्ष होते. त्या खर्चामध्ये वेळ आणि पैसा दोन्हीचा समावेश होतो. एका बिझी कोचसाठी नवीन वाचत राहणे, स्व-परीक्षण करणे, नवीन तंत्र शिकणे किंवा आत्मसात करणे यासाठी वेळ काढणे शक्य होत नाही, तसेच प्रशिक्षणासाठी कोणती साधने विश्वासार्ह आहेत याची खात्री करणेही कठीण असते. परिणामी, ते ब्लॉग, व्हिडिओ आणि कदाचित काही स्वस्त पुस्तके यांसारख्या साहित्याकडे वळतात. कोचिंग सर्टिफिकेशनच्या मोठ्या क्षेत्रात ही स्वीकारली जातात, परंतु याबरोबरच संशोधन, अभ्यापूर्णलेख आणि शैक्षणिक साधनांचा वापर करणे गरजेचा आहे.

खेळाडूंना प्रशिक्षकांकडून काय हवे?

खेळाडूंना प्रशिक्षकांकडून काय हवे, हे खेळ, खेळाडू आणि खेळाचा संदर्भ यांवर अवलंबून असते. आपण ट्रायल आणि एरर ह्या मार्गाने काही गोष्टी शिकू शकतो किंवा मार्गदर्शन करण्यासाठी साधने आणि अनुभवी प्रशिक्षक यांच्या संपर्कात राहू शकतो. तुमच्याकडे फक्त स्वतःचा अनुभव असल्यास तुम्ही मिळालेल्या कोचिंगच्या प्रकाराची किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारचे कोचिंग मिळवायचे आहे याचीच पुनरावृत्ती करू शकता. हे ज्ञान तुम्हाला एका पेक्षा जास्त संदर्भांमध्ये प्रभावी ठरणार नाही. खेळातील कामगिरी वाढवणे हा कोचिंगचा महत्त्वाचा घटक आहे. खेळाडूंना त्यांच्या खेळात सुधारणा करण्यासाठी, डावपेच आखण्यासाठी आणि शारीरिक विकास साधण्यासाठी योग्य मार्गदर्शन करू शकेल अशा प्रशिक्षकाची गरज असते. या क्षेत्रातील त्यांचे ज्ञान सुधारण्यासाठी प्रशिक्षकाने विविध शैक्षणिक पद्धतींचा वापर केला पाहिजे. औपचारिक शिक्षण, ज्यामध्ये शरीरविज्ञान, मोटर लर्निंग, आकलन, मानसशास्त्र, प्रशिक्षणावर वयाच्या वाढीचा प्रभाव आणि अशा अनेक विषयांचा समावेश होतो; त्याचे शिक्षण एका विशिष्ट अभ्यासक्रमाद्वारे खेळाडूंपर्यंत पोचले पाहिजे. त्यामुळे त्यांच्या खेळातील कामगिरी सुधारण्यात मदत होईल.

प्रशिक्षकांना कोणती कौशल्ये आवश्यक

विशिष्ट अभ्यासक्रमाबाहेर होणारे अनौपचारिक शिक्षणही खेळाडूंसाठी महत्त्वाचे असते. प्रशिक्षक नैसर्गिकरित्या आपले छंद जोपासतात, इतर प्रशिक्षकांशी नवीन कल्पनांबद्दल बोलतात, खेळाडूंकडून अभिप्राय घेतात आणि सरावाने काही गोष्टी करून पाहतात, यातूनच अनौपचारिक शिक्षण शक्य होते. प्रत्येक ॲथलीटला प्रशिक्षित कोचची आवश्यक असते, जो त्यांच्या शारीरिक, सामाजिक आणि मानसिक विकासास मदत करण्यासाठी तयार असतो. प्रशिक्षणक नवीन पिढीच्या ॲथलीट्ससाठी सज्ज असतो आणि आयुष्यभर शिकण्यासाठी प्रेरणा देतो.

प्रशिक्षकाची कौशल्ये...

 • त्यांच्याकडे असलेले खेळाचे ज्ञान

 • संवाद आणि ऐकण्याची कौशल्ये

 • मोटिव्हेशन कौशल्ये

 • सुधारणा करण्याची इच्छा

 • कमिटमेंट

 • संयम

 • नियोजन, वेळापत्रक आणि विकास

सदोष प्रशिक्षणाचे परिणाम

 • अयोग्य कोचिंगमुळे दुखापतीचे प्रमाण वाढते

 • वाईट भाषा वापरून केलेल्या प्रशिक्षणामुळे खेळ सोडण्याचा दर वाढतो

 • टीममेट्स किंवा कोचिंग स्टाफमध्ये संघर्ष

प्रशिक्षित प्रशिक्षकामुळे...

 • कमी अधीरता

 • अधिक आत्मविश्वास

 • जास्त प्रेरणा

 • टीममेट आणि प्रशिक्षकांबद्दल सकारात्मक विचार

 • खेळ सोडण्याची शक्यता कमी

Web Title: Mahendra Gokhale Writes Importance Sports Training Certificate India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top