खेलेगा इंडिया... : मूलभूत सुविधांची गरज

खेळामुळे संयम आणि लवचिकता वाढते. क्षमता, कौशल्य आणि सातत्य हे यश मिळवण्याचे महत्त्वाचे घटक आहेत. वर्षानुवर्षांची मेहनत करून देखील कोणीही ऑलिंपिक खेळत सहभागी होता येईल याची खात्री देऊ शकत नाही.
Games
Gamessakal
Summary

खेळामुळे संयम आणि लवचिकता वाढते. क्षमता, कौशल्य आणि सातत्य हे यश मिळवण्याचे महत्त्वाचे घटक आहेत. वर्षानुवर्षांची मेहनत करून देखील कोणीही ऑलिंपिक खेळत सहभागी होता येईल याची खात्री देऊ शकत नाही.

- महेंद्र गोखले

खेळामुळे संयम आणि लवचिकता वाढते. क्षमता, कौशल्य आणि सातत्य हे यश मिळवण्याचे महत्त्वाचे घटक आहेत. वर्षानुवर्षांची मेहनत करून देखील कोणीही ऑलिंपिक खेळत सहभागी होता येईल याची खात्री देऊ शकत नाही. ताबडतोब चांगला परिणाम दिसण्यासाठी सतत त्रास देणे किंवा अवाजवी अपेक्षा ठेवणे यामुळे खेळाडू निराश होतो. अशा वेळेला एक प्रेक्षक म्हणून आपला सहभाग खूप महत्त्वाचा ठरतो; जिथे तुम्ही अशा खेळाडूला प्रोत्साहित करून पुढे जाण्यासाठी मदत करू शकता. खेळात ते खूपच उपयोगी ठरू शकते. कोणत्याही खेळाचा किंवा व्यक्तीचा फॅन म्हणून संयम राखणे गरजेचे आहे.

तरुणांचा सहभाग अनिवार्य

शैक्षणिक क्षेत्रात अनेक त्रुटी आहेत आणि त्यात विशेष म्हणजे खेळाचा राष्ट्रीय पातळीवर लक्षात येईल असा समावेश केलेला नाही. भारतभर सरकारी शाळेतल्या मैदानावर देखील किंवा स्थानिक शाळा कॉलेजच्या मुलांमध्ये सुद्धा खेळाची भूक आणि कौशल्य आहे याची ,आपल्याला जाणीवही नाही. क्रीडा संस्कृती विकसित करण्यासाठी तरुणांचा सहभाग अनिवार्य आहे. असे तरुण खेळाडू सहभागी झाले तर त्यांचे पालकही सहभागी होतील. कालांतराने या बद्दलचा विश्वास निर्माण होऊ शकेल. अशा पद्धतीने संपूर्ण परिस्थिती, पूर्ण प्रक्रिया चांगल्यासाठी बदलेल. आपण शेवटी यशस्वी होऊ. मी मनापासून सांगतो, की इथे मी मांडलेल्या विचारांशी बहुसंख्य कोच, क्रीडा मार्गदर्शक, मैदानाचे कर्मचारी आणि त्यांची टीम सहमत आहेत याची मी खात्री देतो. खेळांडूबरोबर इतर लोकांचा सहभाग देखील मोलाचा आहे. एका प्रक्रियेची गरज आहे. भारतात खरं, तर खूप मोठ्या प्रमाणावर हे घडू शकते मात्र ते घडत नाही. आपण खरोखरीच यासाठी कामाला लागले पाहिजे.

दृष्टिकोन महत्त्वाचा...

आवश्यक त्या साधनांची कमतरता ही अजून एक अडचण आहे. उदाहरणार्थ, हॉकी खेळण्याची इच्छा असणारे खेळाडू आणि त्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा यामध्ये खूपच तफावत आहे. मी हॉकी बद्दल बोलतो आहे. खरंतर हॉकी खेळणारे फार खेळाडू आपल्याकडे नाहीत तरीही ही परिस्थिती असेल तर ज्या खेळासाठी आपल्याकडे जास्तीत जास्त खेळाडू असतील त्या खेळाची परिस्थिती काय असेल? कोणत्याही खेळासाठी आवश्यक सुविधांचा विचार आपल्याला आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात करणे गरजेचे आहे. प्रत्येक वीकएन्डला एखादा सिनेमा पाहण्यापेक्षा पालकांनी मुलांबरोबर खेळासाठी चांगला वेळ घालवला तर अशा प्रकारची मानसिकता विकसित होण्यासाठी मदत होईल. पालकांनी आपल्या स्थानिक पातळीवरचे खेळ आपल्या मुलांबरोबर पहावे. कोणत्याही खेळाडूला एक प्रेक्षक म्हणूनही आपण एक महत्त्वाची भेट देऊ शकतो. शेवटी परंतु महत्त्वाचा आहे दृष्टिकोन. टीमवर्क आणि संघभावना यामुळे एक निकोप दृष्टिकोन विकसित होईल आणि असा दृष्टिकोन खेळाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जोडल्या गेलेल्या सगळ्यांनी बाळगायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com