खेलेगा इंडिया... : क्रीडा संस्कृतीची मानसिकता आणि खेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kabaddi
खेलेगा इंडिया... : क्रीडा संस्कृतीची मानसिकता आणि खेळ

खेलेगा इंडिया... : क्रीडा संस्कृतीची मानसिकता आणि खेळ

- महेंद्र गोखले

क्रीडा प्रकाराची मानसिकता आणि खेळाची संस्कृती याबद्दल काही वास्तवता आणि उपाय यावर चर्चा करणारे हे सदर आहे.

खेळाचे वातावरण आणि क्रीडा संस्कृतीची मानसिकता आपण भारतामधल्या खेळ आणि फिटनेसच्या संस्कृतीबद्दल खूप ऐकले आहे. परंतु, आपल्या इतक्या मोठ्या देशात ती विकसित करण्यासाठी आपल्याला खूप मूलभूत पातळीवर विचार करण्याची गरज आहे. आपण योग्य मानसिकता आणि दृष्टिकोन विकसित करू शकलो तर खरोखरीच चमत्कार घडू शकतो.

क्रीडा संस्कृती कशी विकसित करू शकतो यावर एक नजर -

आजपर्यंत अनेक धावपटू मुले आणि मुली यांनी अनेक स्तरावर म्हणजे शाळा, कॉलेज या स्तरावर कामगिरी केली असेल. कालांतराने ते सोडून देतात. का? आपण कधीही हा विचार करतो का की अशा व्यक्ती खेळ खेळणे का सोडून देतो. कारण त्यांना अपेक्षित असा प्रेक्षक वर्ग त्यांना कधीच मिळत नाही. धावपटूंना/क्रीडापटूंना अपेक्षित प्रेक्षक देऊ या. मग पहा ते आपली कामगिरी उंचावण्यासाठी किती जीव तोडून मेहनत करतील. उदा. भारतातील कबड्डी किंवा ‘खेलो इंडिया’ शाळेच्या स्पर्धा खेळाच्या शैक्षणिक बाजूमध्ये आपला सहभाग असणे किंवा कोणत्याही क्रीडा प्रकारामध्ये स्थानिक पातळीवर जास्तीत जास्त लोकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. कदाचित एखाद्याला खेळाडू म्हणून करिअर करण्याचे स्वप्न साकारता आले नसेल, परंतु तरीही आपण त्या व्यक्तीला खेळाशी निगडित कसे ठेवू शकतो याचा विचार करायला हवा. हा एक मोठा प्रकल्प असू शकतो, ज्यामध्ये सहभागी व्यक्तींना काही बक्षीसे देता येतील.

कोणत्याही स्थानिक पातळीवरील खेळाडूसाठी भारतीय प्रेक्षक मनापासून प्रतिसाद देत नाही. आपल्या स्थानिक खेळाडूला त्याच्या सुरवातीच्या काळात आवश्यक ते प्रोत्साहन देऊ शकत नसल्यास ऑलिंपिक खेळामध्ये भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी होईल, ही अपेक्षा कशी करू शकतो? किंवा क्रीडा संस्कृती आपल्या देशात रुजवली जाईल याची आशा करू शकत नाही. भारतीय प्रेक्षक म्हणून मी सांगतो, संयम ठेवा!

तुम्हाला असे वाटत असेल की वर सांगितलेले घटक एका स्थानिक धावपटूला करिअर करण्यामध्ये महत्त्वाचे असतात तर समाजाच्या दबावाचा विचार करा. साधारण १० ते १२ वर्षे वयात कदाचित ऑलिम्पिकमध्ये यश मिळवण्याची क्षमता असणाऱ्या एखाद्या खेळाडूला त्यापासून परावृत्त करण्याचे काम अनेकदा त्याचे पालकच करत असतात. असा खेळाडू घराच्या दबावातून स्वतःला वाचवू शकला आणि तरीही आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करत राहिला तर त्याच्या बरोबरीच्या समवयस्क व्यक्तींकडून देखील त्याला वेगळ्या दबावाला सामोरे जावे लागते. खेळ आणि त्याचे फायदे पुढील भागात पाहूयात..

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top