
Mahi Deshwandikar Inspiring Story: एकदा ध्येय निश्चित केले की ते पूर्ण होईपर्यंत शांत बसायचे नाही असे अनेकांचे असते. अशीच एक गोष्ट कल्याणच्या माही देशवंडिकरलची आहे. कारण तिने ऑक्सिजन सपोर्टवर दहावीची परीक्षा देत घवघवीत यश मिळवले आहे.
माहीला सिस्टिक फायब्रोसिस म्हणजेच फुफ्फुसाचा होता. यात तिला श्वास घेणे देखील अवघड होत होते.अशा परिस्थितीतही तिने हार न मानता घरातच विश्रांती घेत होम स्कूलिंगच्या माध्यमातून शिक्षणची ज्योत तेवत ठेवली होती. तिने यंदा झालेल्या दहावीच्या परिक्षेत ८६टक्के गुण मिळवले आहे.