

Positive thinking can strengthen self-confidence, mental well-being and the ability to face challenges.
Sakal
डॉ. विद्याधर बापट मानसतज्ज्ञ
सकारात्मक विचारसरणी अमलात येण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात केल्या तर मनाला तसं वळण लागायला मदत होईल.
१ आपल्याकडे असलेल्या क्षमता ओळखूया, लक्षात घेऊया. स्वतःवर आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवूया.
२ आपल्या मनःशांतीचे सुकाणू आपल्याकडे ठेवूया. म्हणजेच इतर माझ्याविषयी काय म्हणतात. मला वाखाणतात की माझ्यावर टीका करतात यावर माझी मनःशांती अवलंबून असता कामा नये. माझा आतला गाभा नेहमीच स्वस्थ, शांत असला पाहिजे.
३ स्वतःविषयी व इतरांविषयीही सतत चांगला विचार करूया. चांगलं बोलूया. इतरांच्या चांगल्या कृतीबद्दल, त्यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन करूया.
४ ज्या लोकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडून यश मिळवलं त्यांचा आदर्श समोर ठेऊया. त्यानं आपल्याला प्रोत्साहन मिळेल आणि सकारात्मक दृष्टिकोन रुजायला मदत होईल.