

Memory Loss can be a normal part of aging, but persistent forgetfulness may require medical evaluation.
Sakal
डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ
एखादी गोष्ट विसरणे ही अगदी सामान्य बाब आहे. प्रत्येकाकडून अधून-मधून काही तरी विसरले जातेच. कधी किल्ली कुठे ठेवलीय आठवत नाही, कधी एखादा फोन नंबर (परिचयाचा) आठवत नाही. कधी एखादे तोंडावर असलेले परिचयाचे नाव आठवत नाही. तरुण असताना आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही. परंतु जसं जसं वय वाढत जातं आणि हे वारंवार घडू लागतं तशी काळजी वाटू लागते. आसपास कुणाला अल्मायझर झाल्याचं कानावर आलं की काळजी आणखीच वाढते. परंतु मग केवळ वयामुळे असं होतंय की कुठल्या आजाराची ही सुरुवात आहे हे कसं जाणायचं? वयपरत्वे हे होत असेल तर त्याला प्रतिबंध करता येईल का?