esakal | इकडून अडचण तिकडून खोळंबा! सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठीही अनेकजण प्रतीक्षेत
sakal

बोलून बातमी शोधा

इकडून अडचण तिकडून खोळंबा!

इकडून अडचण तिकडून खोळंबा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

स्वारगेट : सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी चार ते पाच वर्षांतून जाहिरात येते. त्यातूनही नियुक्तीसाठी तीन ते चार वर्षे वाट पाहिल्यानंतरही नियुक्ती मिळाली नाही तर पुढील जाहिरात येईपर्यंत परीक्षा देण्यासाठीची वयोमर्यादा संपलेली असते. किमान ज्या पदांची तुम्ही जाहिरात काढून निवड केली आहे, त्यांची तरी नियुक्ती करा, असे आवाहन राजकुमार देशमुख यांनी व्यक्त केले.

‘एमपीएससी’द्वारे २०१७ मध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षक या पदासाठी एकूण ८३३ जागांसाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल ९ सप्टेंबर २०१९ रोजी लागला. एकूण ८३३ उमेदवारांची शिफारस कागदपत्र पडताळणीनंतर नियुक्तीसाठी करण्यात आली. या पदासाठी चार चाकी वाहन चालवण्याचे लायसन असणे बंधनकारक आहे. ते नसल्यामुळे कागदपत्र पडताळणीनंतर अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची संख्या जास्त होती. त्याचबरोबर जात प्रमाणपत्र नसणे, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र नसणे, खेळाडू आरक्षणातून निवड झाली असल्यास क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल नसणे या कारणांमुळे देखील अनेक विद्यार्थी अपात्र झाले. पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. त्यामुळे अपात्र झालेल्या विद्यार्थ्यांच्या जागी पहिली प्रतीक्षा यादी १० जुलै २०२० रोजी १०१ जागांसाठी तर दुसरी प्रतीक्षा यादी २८ ऑगस्ट २०२० रोजी ३४ जागांसाठी लागली. म्हणजे एकूण १३५ उमेदवारांची शिफारस या प्रतीक्षा यादींमधून करण्यात आली. परंतु पुन्हा या १३५ मधील अनेक उमेदवार हे कागदपत्र पडताळणीमधून अपात्र ठरले. पात्र उमेदवारांपैकी काहीजणांना नियुक्ती देण्यात आली तर काहीजण अजून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

यातील ८३३ जागा अजूनही पूर्ण भरल्या नाहीत. तरीही जानेवारी २०२० मध्ये याच पदासाठी नवीन २४० जागांची जाहिरात आली. त्याची पूर्वपरीक्षा १५ मार्च २०२० ला झाली. नवीन मागणीपत्र काढून, नवीन जाहिरात येते, मग आधी झालेल्या परीक्षेच्या संपूर्ण जागा भरण्यास टाळाटाळ का केली जात आहे, असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे. ज्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत, जे कागदपत्रे पडताळणीअंती पात्र ठरू शकतात, असे उमेदवार विनाकारण नियुक्तीपासून वंचित आहेत.

हेही वाचा: बनावट भाडेकराराला आळा बसणार; कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार

''खेळाडू आरक्षणामधून खुल्या प्रवर्गाच्या एकूण २२ जागा होत्या. कागदपत्रे पडताळणीनंतर त्यातील ११ उमेदवार नियुक्त झाले. पुन्हा त्या ११ जणांच्या जागी दुसरी प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झाली. त्या अकरापैकी पुन्हा फक्त ५ उमेदवारांना नियुक्ती मिळाली. उर्वरित उमेदवारांचा प्रश्‍न लांबणीवर आहे. या प्रक्रियेमुळे ज्यांची कागदपत्रे वैध आहेत, असे पात्र खेळाडू आजही नियुक्त्यापासून वंचित आहेत.''

- आकाश कांबळे, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी.

loading image