

Maslow hierarchy of needs in schools
sakal
डॉ. मिलिंद नाईक प्राचार्य- ज्ञानप्रबोधिनी प्रशाला
अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अब्राहम मॅस्लोने मांडलेल्या पंचस्तरीय मानवी गरजांपैकी शारीरिक आणि भावनिक सुरक्षिततेचा शिक्षणावर होणारा परिणाम आपण लक्षात घेतला. या लेखात त्या पुढील स्तरांविषयी जाणून घेऊ या.
शिक्षण परिणामकारक होण्यासाठी शाळेतील वातावरण सुरक्षित, आपुलकीचे आणि विश्वासपूर्ण असणे अत्यावश्यक आहे. भीती, दडपण किंवा उपेक्षेच्या वातावरणात खरे शिक्षण घडू शकत नाही. म्हणूनच शाळा ही केवळ पाठ्यपुस्तकी अभ्यासक्रम शिकवण्याची जागा न राहता विद्यार्थ्यांना सामाजिक स्वीकार, भावनिक आधार आणि सुरक्षितता देणारी जागा झाली पाहिजे.