
डॉ. सचिन जैन - संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
आपण आतपर्यंतच्या लेखांमध्ये विविध कौशल्ये वाढविण्यावर भर दिला. त्याच्याशी संलग्न कार्यशाळा आणि उपक्रमांची माहिती घेतली. आपल्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे. तो आत्मसात केल्यास आपल्याला करिअरमध्ये आणि खासगी जीवनातही यशस्वी होण्यास मदत होते. तो पैलू म्हणजे, निर्णायक निर्णय घेण्याची क्षमता!